मुंबई : बॉलिवूड स्टार्स बऱ्याचदा आपल्या आहाराबाबत चिंतित असतात. बातमीनुसार, हे स्टार्स चांगले दिसण्यासाठी फक्त मोजकंच अन्न खाणं पसंत करतात. एवढंच नाही तर स्टार्स बऱ्याचदा चटपटित खाण्यापासून स्वतःला दूर ठेवतात, त्यामुळे अनेकदा प्रश्न पडतो की, आपले आवडते स्टार्स प्रत्यक्षात काय खातात आणि त्यांचे आवडते पदार्थ कोणते?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज आम्ही तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देणार आहोत. खरंतर, अलीकडेच बॉलिवूडची प्रसिद्ध कोरिओग्राफर फराह खान एका शोमध्ये पोहोचली होती. जिथे तिने बॉलिवूडचे दोन स्टार शाहरुख खान आणि सलमान खानच्या आवडत्या पदार्थांबद्दल सांगितलं.


फराहवर विश्वास ठेवायचा झाला तर सलमान खानला सगळं काही खायला आवडतं. शो दरम्यान, फराहने सांगितलं की, 'सलमान खान एकमेव स्टार आहे जो सगळं काही खातो. भात, बिर्याणी आणि छोले असं सगळं काही'. त्याचबरोबर शाहरुख खानबद्दल बोलताना फराह म्हणाली की, 'तो फक्त तंदूरी चिकन खातो, ना मी त्याला रोटी खाताना पाहिलंय, ना भात, ना कधी भाकरी खाताना मी त्याला पाहिलंय'. सलमान खानचा 'राधे: युवर मोस्ट वॉन्टेड भाई' हा चित्रपट काही महिन्यांपूर्वीच प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट प्रेक्षकांना फारसा आवडला नाही आणि हा सिनेमा फ्लॉप ठरला.


सलमान सध्या त्याचा आगामी चित्रपट 'टायगर 3'चं तुर्कीमध्ये शूटिंग करत आहे. त्याचवेळी, जर आपण किंग खानबद्दल बोललो, तर अभिनेता शेवटच्या वर्षी मोठ्या पडद्यावर 2018 मध्ये 'झिरो' चित्रपटात दिसला होता. शाहरुख खान आजकाल त्याच्या पठाण चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. आपल्याला सांगू की दीपिका पदुकोण या चित्रपटात शाहरुख खानसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.