मुबंई : श्रीलंकन ब्यूटी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हा बॉलिवूडचा एक प्रसिद्ध चेहरा आहे. तिने बॉलिवूडमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. पण, गेल्या अनेक दिवसांपासून तिचं वैयक्तिक आयुष्य खूप चर्चेत आहे.  आजकाल जॅकलीनचं नाव  200 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात समोर येताना दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ईडीने सुकेश चंद्रशेखरला २०० कोटी रुपयांच्या  खंडणी प्रकरणात अटक केली होती. या प्रकरणाच्या तपासात सुकेशचं जॅकलीनसोबतही संबंध असल्याचं समोर आलं असून त्याने जॅकलिनवर खूप पैसे खर्च केले आहेत. ज्याची किंमत करोडो रुपये आहे. सुरेशने जॅकलिनला महागडे गिफ्ट्स दिल्याचं रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं होतं.


कोरोना काळातही चर्चेत
फक्त जॅकलीनच नाही तर सुरेशने नोरा फतेहीलाही महागडे गिफ्ट्स दिले आहेत सुकेशनं नोराला बीएमडब्ल्यू कार आणि आयफोन दिल्याची चर्चा रंगली होती. गेल्या वर्षी कोरोना काळातही जॅकलिन खूप चर्चेत होती.  याचं कारण म्हणजे  त्या दिवसांत ती बॉलिवूडचा दबंग खान म्हणजेच सलमान खानसोबत पूर्ण लॉकडाऊनमध्ये त्याच्या फार्म हाऊसमध्ये राहिली  होती. त्यादरम्यान जॅकलिनचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. त्या दिवसांत फार्म हाऊसवर सलमानशिवाय कोणीही नव्हतं. त्यामुळेही या दोघांच्या अफेअर्सच्या जोरदार चर्चा रंगल्या होत्या.