सलमान खानच्या वडिलांना पुन्हा धमकी! स्कूटीवरुन बुरख्यात आलेली महिला म्हणाली, `लॉरेन्स बिश्नोई को...`
Salim Khan Gets Threat : सलमान खान मुंबईत नसताना त्याचे वडील सलीम खान यांना लॉरेन्स बिश्नोईनं दिली धमकी..
Salim Khan Gets Threat : बॉलिवूड चित्रपटसृष्टीतून आता आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सलमान खानच्या कुटुंबाला गॅन्गस्टर लॉरेंस बिश्ननोईनं पुन्हा एकदा धमकी दिली आहे. यावेळी ही धमकी त्यानं सलमान खानचे वडील सलीम खान यांना दिली आहे.
सलीम खान रोज प्रमाणे काल 18 सप्टेंबर रोजी सकाळी मॉर्निंग वॉक करत होते. तेव्हा ते बेंचवर बसले होते. त्याचवेळी गॅलेक्सीकडून एक व्यक्ती बॅन्डस्टॅंडच्या दिशेनं स्कूटीवर जात होता आणि त्याच्या मागे बूर्का घालून एक महिला बसली होती. त्यानं यू-टर्न घेतला आणि सलीम खान यांच्या जवळ येऊन सांगितलं की लॉरेन्स बिश्नोईला पाठवू का? त्या व्यक्तीच्या स्कूटीचा नंबर हा 7444 असल्याची माहिती समोर आली असून पोलिस त्या व्यक्तीच्या शोधात आहे.
दरम्यान, सलमान सध्या मुंबईत नाही. तर काल रात्री तो मोठ्या सिक्योरिटीसोबत मुंबई विमानतळावर दिसला. त्यामुळे सलमान हा त्याचा आगामी चित्रपट 'सिकंदर' च्या शूटिंगसाठी बाहेर गेला. ज्यावेळी तो शहरात नाही त्याचवेळी लॉरेन्स बिश्नोईनं त्याच्या वडिलांना धमकी दिली. दरम्यान, सलीम खान यांनी मिळालेली धमकी पाहता सलमानच्या चाहत्यांना त्याचा त्रास होत आहे. हे पहिल्यांदा नाही जेव्हा लॉरेन्स बिश्नोईच्या गॅंगनं पुन्हा एकदा सलमान खानच्या कुटुंबाला धमकी दिली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून बिश्नोई गॅंग सलमान खानवर हल्ला करण्यासाठी तयार आहे. लॉरेंस बिश्नोई आणि भारत-कॅनडामध्ये वॉन्टेड असलेल्या गॅंगस्टर गोल्डी बराडनं अनेकदा सलमानला मारणार असं म्हटलं आहे. त्यानं मुंबईत सलमानवर हल्ला करण्यासाठी त्यांचे शूटर पाठवले होते. लॉरेंसच्या गॅंगमधला गॅंगस्टर संपत नेहरा 2018 मध्ये गॅलेक्सी अपार्टमेंटची रेकी करण्यासाठी आला होता. तो हल्ला करणार त्या आधीच हरियाणा पोलिसांनी नेहराला अटक केली. त्याची चौकशी केल्यानंतर हे स्पष्ट झालं की सलमानवर हल्ल्याची संपूर्ण प्लॅनिंग त्यानं केली होती.
जानेवारी 2024 मध्ये सलमानच्या पनवेल स्थित असलेल्या फॉर्म हाऊसमध्ये दोन लोकांनी जबरदस्तीनं घुसण्याचा प्रयत्न केला. ते फार्म हाऊसच्या अवतीभोवती असलेल्या तार तोडून आत घुसण्याचा प्रयत्न करत होती. तेव्हाच तिथे सुरक्षेसाठी असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना पकडलं. त्याआधी सलमानला 18 मार्च 2023 ला धमकी देणारे ईमेल करण्यात आले होते. त्यात लिहिलं होतं की गोल्डी बराडला सलमानशी समोरा-समोर बोलायचं आहे. 10 एप्रिलला त्याला धमकीवजा कॉल आले. त्यात सांगण्यात आलं की 30 एप्रिला सलमानवर हल्ला करण्यात येईल. गोल्डी बराडनं आजतकला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं होतं की सलमान त्याच्या टार्गेटवर आहे, जर संधी मिळाली तर तो नक्कीच सलमानची हत्या करेल.