जोधपूर : जोधपूर येथील काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खान याला दोषी ठरविण्यात आले आहे. अन्य कलाकार निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. काळवीट शिकार प्रकरणात अभिनेता सलमान खान याला जोधपूरमधील न्यायालयाने दोषी ठरविले आहे. मात्र, अभिनेत्री सोनाली बेंद्रे, तब्बू, नीलम आणि अभिनेता सैफ अली खान या निर्दोष ठरविण्यात आले आहे.


सलमानला वाटते याची भीती


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलमान खानची आता जेलमध्ये रवानगी करण्यात येणार आहे. सलमान आतापर्यंत अनेकदा जेलमध्ये जाऊन आला आहे. पण सलमानला जेलमध्ये आजही भीती वाटते. २००६ मध्ये सलमान या प्रकरमात जोधपूर जेलमध्येच होता. सलमान आतापर्यंत ३ वेळा जेलमध्ये गेला आहे. सलमानला मच्छर आणि टॉयलेची खूप भीती वाटते. सलमान जेव्ही ही जेलमध्ये गेला तेव्हा त्याला याच गोष्टीने खूप हैराण केलं. सलमान म्हणायचा की. ''जेलमध्ये मला बाथरूमचा खूप त्रास होत होता. मला मच्छर खूप हैराण करायचे असं देखील त्याने म्हटलं आहे. हिट अँड रन प्रकरणात जेलमध्ये असतांना तर सलमान सुरुवातीचे २ दिवस बाथरुममध्ये गेला नव्हता.


३ वेळा गेला आहे जेलमध्ये


वीस वर्षांपूर्वी ‘हम साथ साथ है’ या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या सलमान आणि अन्य कलाकार राजस्थानमध्ये गेले होते. १- २ ऑक्टोबर १९९८ च्या मध्यरात्री दोन काळवीटांची सलमानने शिकार केली होती. निकालाच्यावेळी सलमान याच्यासह सैफ अली खान, नीलम, तब्बू आणि सोनाली बेंद्रे  उपस्थित होते. या प्रकरणात सलमानवर वन्यजीव संरक्षण कायद्याच्या कलम ५१ खाली गुन्हा दाखल  करण्यात आला होता. कोर्टात पोहोचल्यानंतर जज समोर मी निर्दोष असल्याचं सलमान खानने म्हटलं आहे. कोर्टात सलमान खानच सर्वात आधी पोहोचला. यावेळी त्याच्या सोबत अलवीरा आणि अर्पिता देखील उपस्थित होत्या.