मुंबई : सध्या 'बिग बॉस 15'साठी सलमान खानच्या भरमसाठ फीबाबत चर्चा जोरात रंगत आहे. 'बिग बॉस ओटीटी' संपल्यानंतर आता चाहत्यांचं संपूर्ण लक्ष 'बिग बॉस 15'कडे आहे. अभिनेता सलमान खान शो होस्ट करत आहे. या कामासाठी सलमानला मिळत असलेल्या मानधनाचा आकडा वाचून सर्वांनाचं मोठा धक्का बसेल. 'बिग बॉस 15'साठी सलमान मानधनाच्या स्वरूपात जवळपास  350 कोटी रूपये घेत असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मानधनाबद्दल शोच्या निर्मात्यांनी आणि खुद्द सलमान खानने कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिलेली नाही. सलमान खानने 'बिग बॉस 15'च्या 14 एपिसोडसाठी 100-200 कोटी नाही तर संपूर्ण 350 कोटी रूपये घेतले असल्याचं सांगण्यात येत आहे. 



सांगायचं झालं, सलमान खान 'बिग बॉस 4' पासून या शोचे सर्व सीझन होस्ट करत आहे. म्हणूनच शोसोबत त्याचं कनेक्शन खूप खास आहे. शोमध्ये घरातील सदस्यांसोबत मस्ती करणं, त्यांच्या कामगिरीचे कौतुक करणे... या सर्व गोष्टी सलमान उत्तम प्रकारे हाताळतो. 'बिग बॉस'च्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. 


सलमानची फी ऐकून अनेक चाहतेही हैराण झाले आहेत. लोकांच्या मनात एक प्रश्न आहे की, सलमान एवढी फी घेत असताना शोचे बजेट काय असेल? सध्या सलमानच्या मानधनाची चर्चा तुफान व्हायरल होत आहे.