मुंबई : अभिनेता सलमान खानने मुंबईतील मालाड येथील रहिवासी केतन कक्कर यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे. पनवेल येथील अभिनेत्याच्या फार्महाऊसजवळील भूखंडाचा मालक केतन कक्कर यांनी एका यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीदरम्यान आपली बदनामी केल्याचा आरोप करत सलमान खानने खटला दाखल केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलमानचा रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे फार्महाऊस आहे. सलमान खानच्या खटल्यानुसार, कक्करने एका यूट्यूबरशी बोलताना सलमानविरुद्ध खोटी टिप्पणी केली.


याप्रकरणी सलमान खानने यूट्यूब, फेसबुक, ट्विटर आणि सर्च इंजिन गुगल सारख्या सोशल मीडिया साइट्सलाही खटल्यात पक्षकार बनवले आहे. एवढंच नाही तर सलमानने त्यांच्या वेबसाइट्सवरून "अपमानजनक सामग्री" ब्लॉक आणि काढून टाकण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी केली आहे.


याप्रकरणी शुक्रवारी (14 जानेवारी) सिटी सिव्हिल कोर्टामध्ये न्यायाधीश अनिल एच लद्दाद यांच्या समोर सुनावणी झाली. याप्रकणी आता पुढील सुनावणी 21 जानेवारी रोजी होणार आहे. 


सलमान खानचा फॅन क्लब फार मोठा आहे. त्यामुळे आता या प्रकरणी 21 जानेवारीला न्यायालयात काय होणार, याकडे सलमान खानच्या चाहत्यांसह अनेकांचे लक्ष लागले आहे.