मुंबई : बॉलिवूडचा दबंगस्टार सलमान खान हा सोशल मीडियावर क्वचितच अ‍ॅक्टिव्ह असतो. पण सोशल मीडियाचा वापर सलमान  खान आणि त्याच्या टीमने अनेक समाजोपयोगी कार्यांचा प्रसार करण्यासाठी केला आहे.  


सोशल मीडियावर सलमान खान हीट  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉक्सऑफिसवर सलमान खानचे चाहते त्याला तुफान प्रेम देतात. त्याचाप्रमाणे सोशल मीडियावरही त्याचे चाहते अपडेट्सवर लक्ष ठेवून आहेत. इंस्टाग्रामवर सलमान खानचे 14.9 मीलियन फॉलोवर्स आहेत. पण बॉलिवूडमध्ये 'यारों का यार' अशी ओळख असूनही तो केवळ दोन व्यक्तींना फॉलो करतो.  


सलमान कोणाला करतो फॉलो ? 


सलमान खान एका कूकीज विकून पैसे गरजूंना देणार्‍या मुलीला फॉलो करतो. या मुलीसोबतचे फोटोही तिच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आले आहे. तर दुसरे नाव ऐकून तुम्हांला थोडा धक्का बसू शकतो, आणि ती व्यक्ती म्हणजे इसाबेल कैफ. 



इसाबेल ही कॅटरिना कैफची सख्खी बहीण आहे. सलमान खान त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर केवळ या दोघींच्या अकाऊंटला फॉलो करतो.  


सलमान आणि कॅटरिना 


सलमान आणि कॅटरिना हे रिलेशनशीपमध्ये असल्याच्या अनेक चर्चा रंगल्या होत्या. मात्र दोघांनीही याबाबत कधीच कबुली दिली नाही. मात्र कॅटरिना अनेकदा खान कुटुंबीयांच्या पार्टीमध्ये, खाजगी सोहळ्यामध्ये हजेरी लावली होती. सलमान खान बिकट परिस्थितीमध्ये असतानाही तिने खान कुटुंबाची साथ दिली होती.  


कॅटरिनाला बॉलिवूडमध्ये ओळख मिळवून द्यायला सलमान खानने अनेकदा मदत केली आहे. आता कॅटरिनाची बहीणदेखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची चर्चा आहे. मात्र अजूनही कोणत्याही प्रोजेक्टबाबत बोलणं झालेलं नाही.