मुंबई : अभिनेता सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना काही दिवसांपूर्वी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. एका पत्राद्वारे खान कुटुंबातील दोन महत्त्वाच्या व्यक्तींना ही धमकी मिळाल्यानंतर पोलीस यंत्रणांपर्यंतची सूत्र हलवली गेली. खुद्द सलमान सुरक्षिततेच्या व्यवस्थांमध्ये लक्ष घालू लागला. (Salman Khan gets Gun License By Mumbai Police After Death Threats )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जिथे सलमान आतापर्यंत बुलेटप्रूफ कारमधून प्रवास करत होता तिथेच आता त्याला आत्मसंरक्षणासाठी हत्यार बाळगण्याचा परवाना देण्यात आला आहे. एकिकडे मुंबई पोलिसांनी सलमानला आलेल्या धमकी प्रकरणाची चौकशी सुरु केल्यानंतर दुसरीकडे त्यानंही आपल्या सुरक्षा व्यवस्थेत मोठे बदल केले. 


काही दिवसांपूर्वीच त्यानं पोलीस आयुक्तांची भेट घेतली होती. सोबतच रिव्हॉल्वर/ पिस्तुल बाळगण्यासाठीचा परवाना मागणारा अर्जही केला होता. ज्याला परवानगी देण्यात आली आहे. सध्या सलमानच्याभोवती असणारं सुरक्षा कवच आणखी भक्कम होताना दिसत आहे. 


सलमानला का मिळालेली जीवे मारण्याची धमकी? 
1998 मधील काळवीट शिकार प्रकरणी सलमानच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. ज्या काळवीटाला राजस्थानमधील काही भागात पूजनीय स्थान आहे,  पण, याच काळवीटाची शिकार केल्यामुळं सलमानच्या अडचणी वाढल्या. त्याच्याप्रती असणारा रोष इतका वाढला की, लॉरेंस बिष्णोई यानं सलमानला जीवे मारण्याचीच धमकी दिली होती.