मुंबई : तुम्हाला 1989 मधील ब्लॉकबस्टर 'मैने प्यार किया' सिनेमात सलमान खानने घातलेलं आयकॉनीक जॅकेट आठवतंय? सलमान खानची मुख्य भूमिका असलेला हा पहिला सिनेमा आणि अभिनेत्री भाग्यश्रीचा पहिला डेब्यू सिनेमा. या सिनेमाच्या प्रदर्शनानंतर सलमानच्या जॅकेटची भरपूर चर्चा झाली. सिनेमाच्या प्रदर्शनानंतर जॅकेटला तरूणाईकडून खूप मागणी होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तब्बल 30 वर्षांनंतर सलमानला त्याच्या 54 व्या वाढदिवशी असंच एक जॅकेट गिफ्ट करण्यात आलं. सलमानच्या घरी एक छोटेखानी पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी उपस्थित होते. यावेळी 'मर्द को दर्द नही होता' या सिनेमातून पदार्पण करणारा तरूण अभिनेता अभिमन्यू देसानी देखील पार्टीत सहभागी होती. 



अभिमन्यूने सलमानचा हा वाढदिवस अतिशय खास बनवला. सलमानला जुन्या आठवणीत रमण्यासाठी अभिमन्यूने भाग पाडलं. 'मैने प्यार किया' सिनेमातील लोकप्रिय जॅकेट सलमानला गिफ्ट केलं. हे खास गिफ्ट स्वीकारून सलमान प्रचंड खूष झाला. (वाढदिवशी सलमानला बहिणीकडून खास गिफ्ट)


 




अभिमन्यू देसानी हा बॉलिवूड अभिनेत्री भाग्यश्रीचा मुलगा आहे. त्याने ते जॅकेट पार्टीतच घालून आपला आनंद व्यक्त केला. सलमानचा 54 वा वाढदिवस अतिशय खास ठरला. त्याला बहिण अर्पिताकडून खूप छान गिफ्ट देखील मिळालं. पुन्हा एकदा सलमान खान 'मामूजान' झाला आहे. अर्पिता आणि आयुष शर्माच्या घरी 'आयत' या गोंडस मुलीने जन्म घेतला आहे.