COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : सलमान खानच्या फॅन्ससाठी मोठी आनंदाची बातमी आहे. १९९८ मध्ये केलेल्या काळवीट शिकारप्रकरणी सलमानला ५ वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर दोन दिवसातच सलमानच्या जामीन अर्जाला मंजुरी देण्यात आली. या बातमीमुळे सलमानचा परिवार, फॅन्स आणि शुभचिंतकांचा आनंद गगनात मावेनासा झालाय. सलमानला जामीन मिळाल्याच्या बातमीनंतर जोधपुर कोर्टाबाहेर फटाक्यांचा आवाज घुमू लागला. सलमानच्या नावाच्या घोषणांना परिसर दणाणून गेला. तसेच फॅन्सनी कोर्टाबाहेर लाडू आणि पेढे वाटून निर्णयाच स्वागत करत आनंद व्यक्त केला.  मुंबईतही असाच उत्साह पाहायला मिळाला. वांद्रेयेथील त्याच्या राहत्या घरी गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर चाहत्यांनी गर्दी करायला सुरूवात केली. गाजावाजा करुन सलमानच्या मुंबईत येण्याची वाट पाहत आहेत.


बिश्नोई समाजात दु:खाचे वातावरण 


सलमानला जामीन दिल्याच्या निर्णयानंतर बिश्नोई समाजात  दु:खाचे वातावरण पसरले. २० वर्षे चाललेल्या या केसमध्ये मोठा विजय प्राप्त झाला होता. आता सलमानची जामीनावर सुटका झाल्याने बिश्नोई समाजाचा हिरमोड झालाय. कायदेशीर कारवाई पूर्ण झाल्यानंतर सलमानला आज सायंकाळपर्यंत सोडल जाऊ शकेल.