मुंबई : टीव्ही शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेतील डॉ हाथी यांच्या आकस्मात मृत्यूमुळे सगळ्यांनाच चटका लावला. कवि कुमार आझाद या अभिनेत्याचा मृत्यू कार्डियक अटॅकमुळे झालं असल्याचं सांगण्यात येत आहे. 46 वर्षाच्या आझाद यांची तब्बेल गेल्या अनेक कारणामुळे तब्बेत ठिक नव्हती. डॉक्टरांनी त्याला आपलं वजन कमी करण्यासाठी सांगितलं होतं. मात्र हेच डॉ हाथी यांना करायचं नव्हतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कवि कुमार आझाद यांच वजन 265 किलो होतं. मात्र सर्जरीनंतर त्यांनी वजन 140 किलो केलं. मात्र वजन कमी करूनही त्यांचे प्रश्न काही कमी झाले नाही. अजून एक सर्जरी केल्यावर त्यांच वजन 90 किलो झालं असतं. आणि तेव्हा काही त्रास कमी होण्यास मदत झाली असती. मात्र सर्जरी केल्यावर मी बारीक होईन. आणि मग मला काम मिळणं बंद होतील असा त्याचा समज होता. हे पण वाचा : मोठा खुलासा : डॉ हाथी स्वतः वजन वाढवायचे


 


भाईजानने केली होती अशी मदत 


कवी कुमारने 8 वर्षापूर्वी बॅरिएट्रिकची सर्जरी केली होती. त्यावेळी ही सर्जरी डॉ मुफी लाकडवालाने मोफत केली होती. एवढंच काय तर त्यावेळी सलमान खानने देखील मदत केली होती. त्याने आझादला औषध, ऑपरेशन आणि बाकी खर्चासाठी मदत केली होती. 8 वर्षापूर्वी डॉ हाथीची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. तेव्हा सलमान खान त्याच्यासाठी देवदूतासारखा धावून आला.