Salman Khan Handwritten Letter : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आज सगळ्यांच्या मनावर राज्य करत असला तरी एक काळ होता जेव्हा त्याला अभिनय क्षेत्रात एन्ट्री मिळत नव्हती. अनेकांना वाटत असेल की त्याचे वडील सलीम खान हे बॉलिवूडमधील लोकप्रिय लेखक आहेत म्हणून त्याला काम मिळालं असेल किंवा त्याला इतरांपेक्षा लवकर संधी मिळाली. तर तसं नाही... त्यानं सगळं काही स्वत: च्या हिंमतीवर मिळवलं आहे. आता आपल्या चाहत्यांसोबत संपर्क साधण्यासाठी सोशल मीडिया असलं तरी एक काळ होता जेव्हा हे फक्त माध्यमांच्या मदतीनंच होऊ शकत होतं. त्यावेळी सलमाननं स्वत: च्या हातानं एक पत्र लिहिलं होतं. ते सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'मैंने प्यार किया' या चित्रपटातून सलमानला यश मिळालं आणि ते देखील इतकं की तिथे पोहचण्यासाठी अनेकांना खूप वर्ष मेहनत घ्यावी लागली. या चित्रपटाला मिळालेलं प्रेम पाहता सलमाननं त्याच्या चाहत्यांना स्वत: च्या हातानं पत्र लिहंत त्याच्या मनातील गोष्टी सांगत सगळ्यांचे आभार मानले होते. 29 डिसेंबर 1989 रोजी सलमान खानचा 'मैंने प्यार किया' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याच्या चार महिन्यांनंतर एप्रिल 1990 मध्ये सलमाननं हे पत्र लिहिलं होतं. चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर सलमान हे पत्र लिहतं म्हणाला, "या अशा काही गोष्टी आहेत, ज्या मला वाटतं की तुम्हाला माहित हव्या. सगळ्यात आधी मला एक अभिनेता म्हणून स्विकारण्यासाठी आणि माझे चाहते होण्यासाठी सगळ्यांचे आभार. मला आशा आहे की मी जेपण चित्रपट करेन, त्यातं तुमचा अपेक्षा भंग होणार नाही. मी चित्रपटांना घेऊन खूप विचार करतो. मी एका चांगल्या स्क्रिप्टवर काम करतोय आणि त्याकडेच लक्ष देतोय कारण मला या गोष्टीची जाणीव आहे की आता या पुढे मी जे काही काम करेन त्याची तुलना ही मैंने प्यार किया शी होईल. त्यामुळे जेव्हापण तुम्हाला या चित्रपटाविषयी कळेल तेव्हा तुम्ही खात्री बाळगा की चित्रपट चांगला असेल. त्यासाठी मी माझं 100 टक्के देणार आहे." 



पुढे सलमान म्हणाला की "माझं तुमच्यावर प्रेम आहे आणि मला आशा आहे की तुम्ही सगळ अशात प्रकारे माझ्यावर प्रेम करत राहा कारण ज्या दिवशी तुम्ही माझ्यावर प्रेम करणं बंद कराल, माझे चित्रपट पाहणं बंद कराल आणि तोच माझ्या करिअरचा अंत असेल." सलमाननं पत्रात लिहिलेल्या या गोष्टी त्याच्या चाहत्याच्या मनाला भिडल्या. तर आज जेव्हा हे पत्र पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होतंय तेव्हा देखील त्यानं सगळ्यांची मने जिंकली आहेत. इतकंच नाही तर अनेक लोक सलमानच्या हस्ताक्षराची स्तुती करत आहेत. 


हेही वाचा : 'बरेच मुलं वारसा घेतात पण याने..', दिग्दर्शकाची पोस्ट वाचून अभिनय भावुक


'मैंने प्यार किया' या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर सूरज बडजात्या यांचा हा चित्रपट आहे. या चित्रपटात सलमानसोबत भाग्यश्री महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती.