त्याची पूजा करणं थांबवा; सलमानवर गंभीर आरोप करत Ex Girlfriend कडून मोठा गौप्यस्फोट
परंतु सध्या सलमान वेगळ्याच एका कारणाने चर्चेत आला आहे.
Salman Khan : अभिनेता सलमान खान आपल्या बीग बॉस या शोमुळे नेहमीच चर्चेत असतो पण आता सलमान खान बॉयकोट ट्रेण्डच्या निशाण्यावर आहे. सलमानचा टायगर 3 हा सिनेमा पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे. तेव्हा या पार्श्वभुमीवर हा चित्रपटही बॉयकोटच्या रडारवर आहे. परंतु सध्या सलमान वेगळ्याच एका कारणाने चर्चेत आला आहे.
बॉलीवूड अभिनेत्री आणि सलमानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीने पुन्हा एकदा सलमान खानवर निशाणा साधला आहे. यापुर्वीही तिने सलमानवर आरोप केले होते आता पुन्हा एकदा तिने त्याला टार्गेट केले आहे. एक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करत सोमीने सलमान खानच्या 'मैने प्यार किया' चे पोस्टर शेअर केले आणि त्याला कॅप्शन दिले की, सलमान हा महिलांना मारहाण करतो. मलाच नाही तर त्याच्या तावडीतून कोणीच मुलगी सुटली नाही. कृपया त्याची एवढी पुजा करू नका.
तिने याआधीही अशीच एक पोस्ट सलमानच्या विरूद्ध शेअर केली होती. परंतु नंतर ती तिने डिलिट केल्याचे बोलले गेले. याच वर्षी सोमीने एक पोस्ट शेअर केली होती ज्यात तिने लिहिले होते, “बॉलिवुडचा हार्वे वेनस्टीन! तुझा पर्दाफाश होईल. तू ज्या महिलांवर अत्याचार केलेत ते एक दिवस बाहेर येतील आणि त्यांचे सत्य सांगतील. अगदी @aishwaryaaraibachchan_arb सारखे"
80 च्या दशकात 'टारझन' आणि 'हम' सारख्या बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या सोमी अलीने 1990 च्या दशकात सलमान खानला दोन वर्षांहून अधिक काळ डेट केले होते.
सध्या सोमी अली सध्या यूएसमध्ये राहते आहे अशी माहिती कळते.