मुंबई : बॉलिवूडचा दबंग खान सलमान खानची तब्येत अचानक बिघडली आहे. तो सध्या 'टायगर जिंदा है...' या आगामी चित्रपटाचं शूटिंग सध्या ऑस्ट्रियात करत आहे. तेथील हवामानातील फरकामुळे सलमानची प्रकृती बिघडल्याचे सांगितले जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलमानला अस्वस्थ वाटत असल्याची माहिती चित्रपटाचे दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी दिली. पुढे ते म्हणाले, "पडद्यावर जे दिसतं ते वाटतं तितकं सोपं नसतं. शूटिंग करताना कलाकारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. आमच्यासोबत देखील तेच झालं."


'टायगर जिंदा है' हा आमच्यासाठी महत्त्वाचा चित्रपट असून त्याचं शूटिंग आम्हाला एखाद्या एकांतात करायचं होतं. ऑस्ट्रियातील टेकड्यांमध्ये आम्हाला तसं ठिकाण सापडलं. मात्र, सलमानला तिथलं हवामान मानवलं नाही. त्याची प्रकृती बिघडली. तरीही त्यानं एक अॅक्शन सीन पूर्ण केला. तिथं आम्ही एका गाण्याचंही शूटिंगही केलं,' असं जफर म्हणाले.


सलमान कतरिनाची मुख्य भूमिका असलेला 'टायगर जिंदा है...' हा चित्रपट २२ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.