मुंबई : बॉलिवूडचा दबंग खान सलमानने अनेक नवीन अभिनेत्रींना फिल्मी दुनियाचे दरवाजे खुले करून देण्यास मदत केलीये. आता यात आणखीन एक नाव समाविष्ट होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेता चंकी पांडेची कन्या अनन्या हिला सलमान बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावत आहे. चंकी पांडे आणि सलमानची जुनी मैत्री आहे. या मैत्रीतूनच सलमानने अनन्याला फिल्म इंडस्ट्रीत आणण्याचं मान्य केल्याचं सांगितलं जातंय.


अनन्या नुकतीच ग्रॅज्युएट झालेली आहे. अनन्याला आता आपलं करिअर सिनेसृष्टीतच करायचंय. त्यामुळे तिनेही सलमानला आपला गॉडफादर बनविण्याचं ठरवलेलं दिसतंय.  


अनेक हिरोईन्स आज सलमानमुळेच या इंडस्ट्रीत आलेल्या असल्याचा इतिहास आहे. सोनाक्षी सिन्हा असो की कतरिना अशा अनेकींना सिनेइंडस्ट्रीत येण्यास सलमानने मोलाची मदत केली आहे.


आता अनन्याला सलमान कोणत्या फिल्ममधून बॉलिवूडच्या या रंगीबेरंगी दुनियेत आणतोय हे पाहणं उत्सुकतेचं असणार आहे.