मुंबई :  बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि दबंग खान सलमान यांच्यातील मैत्री तूम्हाला माहिती असेलच. जॅकलीनचा सिनेमा असो कोविडमध्ये दिलेली मदत सलमान तिच्या मदतीला धावत असतोच. मात्र आता सलमानला तिचा पाठिंबा असताना देखील ती मोठ्या प्रकरणात फसलीय. त्यामुळे आता ती या प्रकरणातून कशी बाहेर पडत हे पहावे लागेल.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाठग सुकेश चंद्रशेखरच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने जॅकलिनला क्लीन चिट दिलेली नाही, त्यामुळे जॅकलिनच्या परदेश प्रवासावर बंदी घालण्यात आली होती. जॅकलिनने केलेल्या अर्जात तिने नेपाळ दबंग टूरला जायचे आहे, असे म्हणत न्यायालयाकडे 15 दिवसांची परवानगी मागितली होती.


जॅकलीनचा दावा निघाला खोटा 
न्यायालयात केलेल्या अर्जात पडताळणीच्या वेळी जॅकलीन परदेशात जाण्याचे कारण ईडीला सापडले नाही. जॅकलिनने दावा केला होता की तिला नेपाळ दबंग टूरला जायचे आहे. मात्र तपास यंत्रणेने जॅकलिनचे दावे फेटाळून लावलेत. जॅकलीन दबंग टूरचा भागही नसल्याचा खुलासा ईडीने केला आहे. हे खोटे तपास यंत्रणेसमोर आल्यानंतर जॅकलिनला कोर्टात दिलेला अर्ज मागे घ्यावा लागला.


सूत्रांच्या माहितीनुसार, 20-21 मे रोजी अबू धाबी येथे होणाऱ्या आयफा अवॉर्ड्समध्ये जॅकलिनला हजेरी लावायची होती. अबुधाबीशिवाय जॅकलिनला फ्रान्स, नेपाळलाही जावे लागले. जॅकलीनही कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणार होती. यासोबतच नेपाळमधील दबंग टूरमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा होती. मात्र आता तिचे खोटे कारण समोर आल्याने जॅकलिनला कोर्टात दिलेला अर्ज मागे घ्यावा लागला. त्यामुळे बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. ते आयफा अवॉर्ड्समध्ये जॅकलिनला पाहू शकणार नाहीत. 


प्रकरण काय ? 
महाठग सुकेश चंद्रशेखरच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने जॅकलिनला क्लीन चिट दिलेली नाही, त्यामुळे जॅकलिनच्या परदेश प्रवासावर बंदी घालण्यात आली आहे. या प्रकरणी ईडीने जॅकलिनची अनेकदा चौकशीही झालीय. कारण सुकेशने फसवणुकीच्या पैशातून जॅकलिन आणि तिच्या कुटुंबीयांना महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या. त्यामुळे कठोर भूमिका घेत ईडीने जॅकलिनची ७.२७ कोटींची संपत्तीही जप्त केली आहे.