सलमानच्या अभिनेत्रीने वयाच्या 40 व्या वर्षी दिला बाळाला जन्म
सलमान खानसोबत अनेक हिट सिनेमे देणाऱ्या अभिनेत्रीची चर्चा सुरू झाली आहे. या अभिनेत्रीने वयाच्या 40 व्या वर्षी बाळाला जन्म दिला आहे. 23 सप्टेंबर रोजी तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. ही अभिनेत्री आहे रंभा.
मुंबई : सलमान खानसोबत अनेक हिट सिनेमे देणाऱ्या अभिनेत्रीची चर्चा सुरू झाली आहे. या अभिनेत्रीने वयाच्या 40 व्या वर्षी बाळाला जन्म दिला आहे. 23 सप्टेंबर रोजी तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. ही अभिनेत्री आहे रंभा.
रंभाने आपल्या तिसऱ्या मुलाला जन्म दिला आहे. या अगोदर तिला 2 मुली आहेत. 7 वर्षांची लावण्या आणि 4 वर्षांची साशा असं या मुलींच नाव आहे. टोरंटोच्या माऊंट सिनाई हॉस्पिटलमध्ये रंभाने मुलाला जन्म दिला आहे. रंभाचा नवरा इंद्रन पद्मनाथनने इंस्टाग्रामवर याची माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, रंभा आणि बाळं दोघेही सुखरूप आहे. रंभा गेल्या अनेक वर्षांपासून सिनेसृष्टीपासून लांब आहे.
रंभा सोशल मीडियावर भरपूर अॅक्टिव आहे. काही दिवसांपूर्वी रंभाचं बेबी शॉवर झालं होतं. रंभाने या सोहळ्याचे अनेक फोटो शेअर केले होते. बेबी शॉवरमध्ये तिने खूप आनंद लुटला होता. या कार्यक्रमात ती अतिशय सुंदर दिसत होती.
रंभाने सलमान खानसोबत जुडवा आणि बंधन या सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं आहे. हिंदीसोबतच तिने तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्यालम या भाषेतील सिनेमांत देखील काम केलं आहे. 2010 मध्ये बिझनेसमन इंद्रन पद्मनाथनसोबत लग्न केलं. आणि त्यानंतर तिने सिनेमांना राम राम ठोकला.