Salman Khan' s Avenger Endgame connection : बॉलिवूडचा भाईजान आणि अभिनेता सलमान खानचे लाखो चाहते आहेत. सलमान खान सध्या त्याच्या ‘टायगर 3’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याच्या या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेनं प्रतिक्षा करत आहेत. सलमानखानला काही हवं असेल आणि त्याला ते मिळालं नाही असं शक्य नाही. सलमान खान हा सोशल मीडियावर चर्चेत असतो. त्याचे चर्चेत राहण्याचे कारण हे नेहमीच वेगवेगळे असते. दरम्यान, सलमान खान आता एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. सलमान खानचे Avenger Endgame मधील एका व्यक्तीशी असलेलं खास कनेक्शन समोर आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनिश शर्मा दिग्दर्शित या चित्रपटाच्या प्रदर्शनाची एकीकडे प्रतिक्षा असताना आता याविषयी एक मोठी बातमी समोर आली आहे. एकीकडे प्रेक्षकांसमोर टायगर या फ्रॅन्चायझीनं प्रेक्षकांच्या अपेक्षा खूप वाढवल्यानं त्यांनी यात आता एक मोठी गोष्ट केली आहे. इमरान हाश्मी या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्या दोघांना अॅक्शन करताना पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. प्रेक्षकांच्या अपेक्षा भंग व्हायला नको यासाठी निर्मात्यांनी हॉलिवूडमधील लोकप्रिय अॅक्शन कोऑर्डिनेटर ख्रिस बार्न्स यांना चित्रपटाचा भाग म्हणून घेतले आहे. ख्रिस बार्न्स यांनी अॅव्हेन्जर्स : एन्डगेम साठी देखील काम केले होते. ख्रिस यांनी फक्त अॅव्हेन्जर्स : एन्डगेम नाही तर आय एम लेजन्ड, डॉक्टर स्ट्रेन्ज, स्पायडर-मॅन: फार फ्रॉम होम आणि अॅव्हेन्जर्स : इनफिनीटी वॉर या चित्रपटांसाठी देखील काम केले आहे. 



'टायगर 3' या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर या चित्रपटात सलमान खानसोबत कतरिना कैफ देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट यश राज फिल्म्स स्पाय युनिवर्सच्या बॅनर खाली बनवण्यात येत आहे. या बॅनरखालीच ‘पठाण’ आणि ‘वॉर’ हे चित्रपट देखील येणार आहेत. हा चित्रपट हिंदी, तामिळ आणि तेलुगू या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. दिवाळीत हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे म्हटले जाते.


हेही वाचा : 


पिंकव्हिलानं दिलेल्या माहितीनुसार, लवकरच सलमान खान आणि कतरिना कैफ हे दोघे 'टायगर 3' च्या डबिंगला सुरुवात करणार आहेत. या चित्रपटात शाहरुख खान हा पठाण या भूमिकेत पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळेच त्या दोघांना एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत.