मुंबई : अभिनेता सलमान खानचा भाऊ सोहेल खान कायम चर्चेत असतो. सोहेलने अभिनय क्षेत्रात करियर करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचं अभिनेता होण्याचं स्वप्न फेल ठरलं. त्यानंतर सोहेलने दिग्दर्शनाकडे आपला मोर्चा वळवला. सोहेलने 1997 साली प्रदर्शित झालेल्या 'औजर' सिनेमाचं दिग्दर्शन केलं. सिनेमात सलमान खान, संजय कपूर आणि शिल्पा शेट्टी प्रमुख भूमिकेत झळकले. 
 
सोहेलच्या प्रोफेशल लाईफ प्रमाणेचं त्याची खासगी लाईफ देखील कठीण होती. सोहलला हवं तसं यश मिळालं नसलं तरी त्याची लव्हस्टोरी मात्र हिट झाली. एखाद्या फिल्मी कथेपेक्षा त्याची लव्हस्टोरी फार सरस आहे. त्याच्या लव्हस्टोरी समोर 90 च्या दशकातील सिनेमाही फिका ठरेल. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोहेलची पत्नी मुळची दिल्लीची आहे. ती फॅशन डिझायनिंगमध्ये करिअर करण्यासाठी मायानगरीत आली होती. हिच ती वेळ जेव्हा सोहेल अणि सीमाची ओळख झाली आणि पहिल्याच नजरेत सोहेल सीमा खानच्या प्रेमात पडला. पण त्यांच्या नात्याला सीमाच्या आई-वडिलांचा विरोध होता.


त्यामुळे त्यांच्या लग्नाचा मार्ग सोपा बिलकूल नव्हता. दोघांनी घरच्यांना समजवण्याचा अथक प्रयत्न केला. पण त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही. त्यानंतर त्यांनी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. सोहेलनं मंदिरात सीमासोबत लग्न केलं. 



त्यानंतर मध्यरात्री दोघांच्या लग्नासाठी मौलवीचंही अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर सर्व काही कबूल करण्यात आलं. लग्नाच्या अनेक वर्षांनंतर देखील सीमाच्या घरच्यांनी त्यांच्या लग्नाला मान्यता दिली नव्हती. 


पण आता तिच्या घरच्यांनी सोहलचा जावई म्हणून स्वीकार केला आहे. सोहेल आणि सीमाला दोन मुलं आहेत.