सलमान खानकडून ऐश्वर्या रायचा छळ, भाईजानच्या जवळच्या व्यक्तीचा खुलासा
पोलिसात तक्रार दाखल केल्याचं ही तिने म्हटलं आहे.
मुंबई : अभिनेता सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या नात्याबद्दल सर्वांनाच ठावूक आहे. दोघांच्या रिलेशनशीपपासून ते ब्रेकअप पर्यंत सर्व गोष्टी चर्चेत राहिल्या आहेत. दोघांमधील वाद देखील सगळ्यांनाच भारावून टाकणारा होता. सलमान खानचे या व्यतिरिक्त अनेक ग्लॅमरस अभिनेत्री आणि मॉडेलसोबत नाव जोडले जाते. त्यात
अभिनेत्री सोमी अली हीचा ही समावेश आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमुळे सोमी चांगलीच चर्चेत आली आहे. या मुलाखतीत सलमान खानसोबतच्या नात्याबाबत अनेक गोष्टी तिने अखेर उघड केल्या आहेत. आणि मोठे आरोप ही केले आहेत.
सोमी म्हणाली सलमान खानसाठी मी भारतात आली
सोमी अलीने यापूर्वी मुलाखतीत सांगितले होते की, ती सलमानचा चित्रपट पाहून भारतात आली होती. सध्या तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये सोमी अली तिच्या नात्याबद्दल बोलत आहे. ज्याच्यासाठी ती तिचे घर सोडून भारतात आली होती, तोचं व्यक्ती तिला मारहाण करायचा.
मुलाखतीत सोमी म्हणाली, मी 16 वर्षांची होती. मी 'मैने प्यार किया' चित्रपट पाहिला आणि सलमान खानच्या प्रेमात पडली. मला वाटले की मला त्याच्याशी लग्न करायचे आहे. मी आईला सांगितले की मी उद्या भारतात जाणार आहे. अखेर मी भारतात आले आणि सलमानसोबत लग्न करण्याची माझी इच्छा होती.
तर मुलखतीत तिने ऐश्वर्या राय आणि सलमान खान यांच्या नात्याचा ही उल्लेख केला. यावेळी तिने ऐश्वर्याच्या धाडसाचं विशेष कौतुक केलं. आणि सलमानने ऐश्वर्याला ही त्रास दिल्याचं तिने सांगितलं. एवढंच नाही तर ऐश्वर्याच्या कुटुंबाने सलमानविरोधात पोलिसात तक्रार दाखल केल्याचं ही तिने म्हटलं आहे.
सलमान खान आपल्याला मारायचा आणि शिवीगाळ करायचा असा दावा ही सोमीने केला आहे.