मुंबई : सलमान खान बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणारा स्टार आहे. तो जवळपास 33 वर्षे तो चित्रपटसृष्टीत कार्यरत आहे. आणि त्याने एकापेक्षा-एक  ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 2016 मध्ये 100 कोटी फी घेणारा सलमान हा पहिला स्टार बनला होता. यानंतर, जेव्हा त्याने 'टायगर जिंदा है' सिनेमाचा सिक्वेल साईन केला तेव्हा त्याची फी 130 कोटी रुपये एवढी होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता 'टायगर 3' या चित्रपटाचा अंतिम भाग तयार होत असल्याने यावेळीही सलमानला 100 कोटींहून अधिक फी मिळण्याची शक्यता आहे. या चित्रपटाचं बजेट 300 कोटी आहे. तसं, चित्रपटांव्यतिरिक्त, सलमानच्या कमाईचा मोठा भाग प्रॉडक्शन हाऊस आणि इतर अनेक गुंतवणूकीतून येतो. सलमान प्रॉपर्टी, व्हेकेशन, कार आणि चॅरिटीवरही भरपूर पैसा खर्च करतो. काही दिवसांपूर्वी सलमानने त्याच्या मुंबईतील एक अपार्टमेंट भाड्याने दिलं होतं.


सलमान स्वतः मुंबईतील वांद्रे भागात असलेल्या गॅलेक्सी अपार्टमेंट्सच्या 1 BHK फ्लॅटमध्ये अनेक वर्षांपासून राहतोय. याशिवाय अनेक ठिकाणी त्याची मालमत्ताही आहे. याशिवाय सलमानने बहीण अर्पिताच्या नावावर मुंबईजवळ पनवेलमध्ये एक आलिशान फार्महाऊसही बांधलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलमानची एकूण संपत्ती 2,255 कोटी रुपये आहे.


मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलमानच्या संपूर्ण कमाईनुसार त्याची एक महिन्याची कमाई जवळपास 16 कोटी रुपये आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बिग बॉस 15 होस्ट करण्यासाठी सलमानला 350 कोटी रुपये फी मिळते.