Salman Khan : अभिनेत्री श्वेता तिवारीची लेक पलक तिवारीनं काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत सांगितले होते की सलमान खानच्या सेटवर मुलींच्या कपड्याविषयी काही नियम आहेत. सेटवर मुलींनी पूर्ण कपडे परिधान करायला हवे. इतकंच काय तर त्यांची नेक लाइन ही डीप नसली पाहिजे. त्यानंतर सोशल मीडियावर सलमान खानला ट्रोल करण्यात आले होते. आता सलमाननं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सेटवर मुलींनी पूर्ण कपडे परिधान करण्याच्या नियमावर वक्तव्य केलं आहे. त्याविषयी बोलताना सलमान म्हणाला,  त्याला चित्रपटाच्या सेटवर कुटुंबासारखं वातावरण ठेवायला आवडतं. महिलांनी पूर्ण कपडे घालायला हवे. काही मुलांचे इरादे चांगले नसतात. तस काही त्याच्या सेटवर झालेलं त्याला पाहायचं नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलमाननं नुकतीच 'आप की अदालत' या कार्यक्रमात हजेरी लावली होती. या मुलाखतीत सलमान मुलींनी सेटवर कव्हर करणारे कपडे का परिधान करावे किंवा त्यांची नेकलाइन डेप नसण्यावर आणि त्याचसोबत या सगळ्यासाठी आजकालची मुलं जबाबदार असल्याचे म्हटले आहे. जेव्हा आपण एक डिसेंट चित्रपट बनवतो तेव्हा संपूर्ण कुटूंबासोबत जाऊन पाहतो. महिलांचे शरीर हे खूप मौल्यवान आहे तर मला वाटतं की जेवढं ते कव्हर असेल तेवढं चांगलं होईल.' 
 
सलमान पुढे म्हणाला, 'आजकाल हे सगळं मुलींमुळे नाही तर मुलांमुळे होतं आहे. ज्या प्रकारे मुलं मुलींना पाहतात, तुमची बहीण, पत्नी, आई त्यांना हे आवडणार नाही. कधी-कधी लोकांचे इरादे हे चांगले नसतात तर माझे प्रयत्न हेच आहेत की जेव्हा आम्ही चित्रपट बनवू तेव्हा आमचे प्रयत्न असतील की आमच्या महिलांना अशा प्रकारे बघायला नको.' 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


दरम्यान, सलमान पुढे चित्रपटांमध्ये हस्तक्षेप करण्याच्या आरोपावर म्हणाला, 'मी हस्तक्षेप करत नाही, पण मदत करण्याचा प्रयत्न करतो. पुढे ओटीटीवर असलेल्या कॉन्टेन्टविषयी बोलताना सलमान म्हणाला, चित्रपटांमध्ये जर थोडे पंच वाढले तर त्याला ए सर्टिफिकेट मिळतं पण इथं सगळं वेगळं आहे. वेगळ्याच प्रकारचं आहे. इथे ए, बी सर्टिफिकेट काहीच नाही.' 


हेही वाचा : लग्न नाही तर Salman Khan नं केलं होतं बाळाचं प्लॅनिग! अभिनेत्याचा खुलासा; म्हणाला "काही वर्षांपूर्वी..."


सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर चित्रपटानं 100 कोटींचा आकडा पार केला आहे. पण चित्रपटानं अपेक्षे प्रमाणे कमाई केली नाही. तर लवकरच सलमान 'टायगर 3' या चित्रपटात दिसणार आहे. तर चित्रपटात त्याच्यासोबत कतरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहे.