अगली बार बडा झटका देंगे; पुन्हा एकदा Salman Khan ला जीवे मारण्याची धमकी!
Salman Khan ला या आधी देखील जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. आता पुन्हा एकदा त्याला धमकी मिळाली आहे. मात्र, यावेळी सलमानला मेलच्या माध्यमातून धमकी देण्यात आली आहे. त्याआधी सलीम खान यांच्या हातात एक चिठ्ठी देत त्यांना आणि सलीम खान यांना मारण्याची धमकी दिली होती.
Salman Khan Death Threat : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानला (Salman Khan) पुन्हा एकदा धमकी देण्यात आली आहे. आता सलमानला ईमेल करत धमकी देण्यात आली आहे. याआधी देखील सलमानला जीवेमारण्याची धमकी देण्यात आली आहे. वांद्रेच्या बॅंड स्टॅंड या परिसरात सलमानचे वडील सलीम खान हे वॉकला गेले असताना त्यांच्या बाजूला कोणी ही चिठ्ठी ठेवून धमकी दिली होती. दरम्यान, आता सलमानला जो मेल आला आहे. त्या मेलमध्ये दिल्लीच्या तुरुंगात असलेला गुंड बिश्नोईच्या नावाचा उल्लेख आहे. काही दिवसांपूर्वी त्याची एका मुलाखत दाखवण्यात आली होती. या मुलाखतीविषयी सांगत सलमानला धमकी देण्यात आली आहे.
सलमानला आलेल्या मेलमध्ये काय म्हटले आहे?
काही दिवसांपूर्वी बिश्नोईचा तुरुंगातील एक मुलाखत व्हायरल झाली होती. त्या मुलाखतीवरून सलमानला जो मेल आला आहे त्यात म्हटले आहे की, गोल्डी भाई को बात करनी है तेरे बॉस सलमान से. (बिश्नोई) इंटरव्ह्यू देख लिया होगा उसने. अगर नाही देखा तो बोल देना देख लेगा. मॅटर क्लोज करना है तो बात करवा दियो. फेस टू फेस करना है तो बता दियो. अभी टाइम रहते इन्फॉर्म कर दियो, अगली बार बडा झटका देंगे
सलीम खान यांना कधी दिली होती ही चिट्ठी?
सलीम खान यांना ही चिठ्ठी गेल्या वर्षी जून 2022 साली ती वॉकला गेले असताना त्यांनी दिली होती. या चिठ्ठीमध्ये म्हटले होते की 'आपकाही जल्द मुसेवाला होगा' हा मेसेज सलीम आणि सलमान खान या दोघांसाठी होता. त्यानंतर या प्रकरणात चौकशी करण्यात आली होती. चौकशीमध्ये या धमकीच्या मागे लॉरेन्स बिश्नोई याचा हाथ असल्याचे समोर आले होते.
या प्रकरणात आता पुन्हा एकदा सलमानला मेल आला असून हा सलमानच्या ऑफिसमध्ये आला होता. आता हा मेल थेट सलमानला आला नाही तर त्याच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याच्या ईमेलवर हा मेल आला आहे. या मेलमध्ये म्हटले आहे की 'गोल्डी भाई को बात करनी है तेरे बॉस सलमान से. अगली बार बडा झटका देंगे'. हा मेल पाहताच सलमानच्या कर्मचाऱ्यानं वांद्रे पोलिस ठाण्यात जाऊन त्याची दखल घेत तक्रार दाखल केली. त्यानंतर गोल्डी भाई म्हणजेच (गोल्डी बरार) आणि लॉरेन्स बिश्नोई या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.