मुंबई : सध्या सलमान खान बिग बॉस 16 होस्ट करताना दिसत आहे. यासोबतच तो त्याच्या आगामी 'किसी का भाई किसी की जान' या चित्रपटाचं शूटिंगही करताना दिसत आहे. या चित्रपटात साऊथची लोकप्रिय अभिनेत्री पूजा हेगडे मुख्य भूमिकेत आहे. आज 13 ऑक्टोबर रोजी पूजा तिचा 32 वा वाढदिवस साजरा करत आहे. तिचा वाढदिवस चित्रपटाच्या सेटवर साजरा करण्यात आला. या सेलिब्रेशनमध्ये साऊथ सुपरस्टार व्यंकटेश आणि जगपती बाबूही उपस्थित होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याचा व्हिडिओ सलमान खान फिल्म्सच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ चाहत्यांसाठी एखाद्या ट्रीटपेक्षा कमी नाही. अनेक स्टार्स एकत्र पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे. पण, यादरम्यान सलमान खानचा लूक सर्वाधिक चर्चेत आला आहे. ज्यावर चाहते कमेंट करत प्रतिक्रिया देत आहेत.


या लूकमध्ये सलमान खान तरुण दिसत आहे. त्याच्या लूकने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. एका चाहत्याने लिहिलं की,  भाऊ तू कसा दिसतोस. अनेक चाहत्यांनी पूजाला शुभेच्छाही दिल्या आहेत. फोटोंमध्ये पूजा सलमानला केक भरवताना दिसत आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


किसी का भाई किसी की जान हा फरहाद सामजी दिग्दर्शित एक अ‍ॅक्शनपॅक एंटरटेनर आहे आणि त्यात सलमान खान, पूजा हेगडे आणि व्यंकटेश प्रमुख भूमिकेत आहेत. ज्याची घोषणा लवकरच होणार आहे. याची निर्मिती सलमान खान फिल्म्सने केली आहे आणि अॅक्शन, कॉमेडी, ड्रामा, रोमान्स आणि इमोशन यांसारख्या सलमान खानच्या चित्रपटात अपेक्षित असलेल्या सर्व घटकांचं आश्वासन दिलं आहे.
 
किसी का भाई किसी की जानचे दिग्दर्शन फरहाद सामजी यांनी केलं आहे. या चित्रपटात सलमान आणि पूजा व्यतिरिक्त शहनाज गिल देखील एका खास भूमिकेत दिसणार आहे.