मुंबई : अभिनेत्री राखी सावंत एक दिवसही चर्चेत आल्याशिवाय राहत नाही. राखी नेहमीच सुपरस्टार सलमान खानला तिचा भाऊ म्हणते आणि त्याचं खुलेपणाने कौतुक करते. राखी सावंतच्या आईच्या उपचारादरम्यानही सलमान खानने तिला खूप मदत केली होती. कदाचित यामुळेच राखी सावंतने आता सलमान खानला कोणी गोळी मारली तर ती स्वत:वर घ्यायला तयार असल्याचं म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खूप खुश आहे राखी सावंत
राखी सावंत नुकतीच तिचा बॉयफ्रेंड आदिल दुर्राणीसोबत नाईट आऊटवर दिसली.  येथे पापाराझींशी बोलताना राखी सावंत म्हणाली की, सलमान खानकडे बंदूक परवाना नसल्यामुळे याचा मला खूप आनंद आहे. सलमान खानला लवकरच बंदुकीचा परवाना मिळावा, अशी मनापासून प्रार्थना केल्याचं राखीने सांगितलं. राखी म्हणाली, 'मी खूप आनंदी आहे आणि मला त्याला सांगायचं आहे की,  सलमान सर, टेन्शन घेऊ नका, तुम्हाला काहीही होणार नाही. संपूर्ण देशाच्या प्रार्थना तुमच्यासोबत आहेत आणि मी त्यांच्यासाठी रात्रंदिवस प्रार्थना करते.  


'बॉडीगार्ड बनण्याची तयार आहे'
राखी सावंतने हेही सांगितलं आहे की, तिला सलमान खानचा बॉडीगार्ड व्हायचं आहे. राखीने सांगितलं की, ती बॉडीगार्ड म्हणून सलमान खानसाठी जीवही द्यायला तयार आहे. ती म्हणाली, 'जर गरज पडली तर मी सलमान खानची बॉडीगार्ड बनण्यास तयार आहे.  आणि यावेळी मी त्याच्या पुढे चालेन आणि कोणी गोळी झाडली तर ती मी गोळी स्वत:वर घेईन. माझ्या भावाला मी काहीच होऊ देणार नाही'.



पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येचा आरोप असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. सलमान खानला मारण्याचा विढा बिश्नोईने आधीच दिला असून शूटरही सलमानला मारण्यासाठी मुंबईत पोहोचल्याचं बोललं जात आहे. अलीकडेच सलमान खान आणि सलीम खान यांना पुन्हा धमक्या मिळाल्यानंतर त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहेच पण त्यांच्या नावावर बंदुकीचे परवानेही जारी करण्यात आले आहेत. या धमक्यांमुळे सलमानने आता बुलेटप्रूफ वाहनातूनही प्रवास सुरू केला आहे.