मुंबई : दिवाळीचं औचित्य साधून तुम्हांला गोडाधोडाचे पदार्थ, मिठाई, सुकामेवा अशी अनेक गिफ्टस मिळाली असतील.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 सलमान खानेने मात्र  त्याच्या चाहत्यांसाठी आज नरक चतुर्दशीच्या दिवशी एक खास गिफ्ट दिले आहे. 


सलमान खानने ट्विटरच्या माध्यामातून 'टायगर जिंदा है' या चित्रपटाचा पाहिला लूक चाहत्यांच्या भेटीला आणला आहे. 'एक था टायगर' या चित्रपटाचा सिक्वेल 'टायगर जिंदा है' यंदाच्या ख्रिस्मसला रसिकांच्या भेटीला येणार आहे. 



 


'टायगर जिंदा है' या चित्रपटातून बर्‍याच वर्षांनी सलमान खान आणि कॅटरिना कैफ ही रोमॅंटिक जोडी पदद्यावर पाहायला मिळणार आहे.  त्यामुळे सलमान- कॅटरिनाच्या फॅन्समध्ये या चित्रपटाबाबत फारच उत्सुकता आहे. 
'टायगर जिंदा है' या चित्रपटाचा ट्रेलर ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात रिलीज करण्यात येईल अशी माहितीही देण्यात आली आहे.  


'टायगर जिंदा है' या चित्रपटाबाबत रसिकांमध्ये उत्सुकता असल्याने आतापर्यंत अनेक फॅन्सनी स्वतःहून बनवलेली काही पोस्टर्स सोशल मीडियामध्ये शेअर केली होती.