VIDEO : चाहता फुलांचा गुच्छ घेऊन येताच सलमानच्या बॉडीगार्ड्सनं दिला धक्का!
Salman Khan : सलमान खानच्या चाहत्यांसोबत त्याच्या बॉडीगार्डची चुकीची वागणूक. थेट चाहत्याला मारला धक्का, व्हिडीओ होतोय व्हायरल
Salman Khan : बॉलिवूड अभिनेता सलमान खानचे लाखो चाहते आहेत. जिथे सलमान खान दिसला की तिथे त्याचे चाहते त्याला पाहण्यासाठी किंवा त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी गर्दी करत असल्याचे पाहायला मिळते. नुकताच सलमानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत सलमान खूप सिक्योरिटी असताना मुंबई विमानतळातून बाहेर येत असल्याचे पाहायला मिळाले. तेव्हाच त्याच्या एका चाहत्यानं जे केले ते पाहता त्याच्या बॉडीगार्डनं थेट धक्काच दिला.
सलमान हा 54 व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवर ऑफ इंडियामध्ये शामिल होण्यासाठी गेला होता. काल परत येत असताना. मुंबई विमानतळावर सलमानला खूप टाईट सिक्यॉरिटीत स्पॉट करण्यात आलं. यावेळी सलमानसोबत शेरा देखील होता. तर फक्त शेरा नाही तर त्याच्यासोबत बॉडीगार्ड्सची टीम आणि Y+ सिक्यॉरिटीची टीमसोबत होईल. या सगळ्यात एक फॅन फुलांचा गुच्छ घेऊन सलमानच्या जवळ जातांना दिसला. जसा तो चाहता जवळ आला, बॉडीगार्डनं त्याला लगेच लांब ढकललं. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीवर कमेंट करत नेटकरी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
लॉरेंस बिश्नोईनं सलमान खानला जिवेमारण्याची धमकी दिली आहे. तेव्हापासून सलमान खान हा टाइट सिक्योरिटीमध्ये दिसतो. त्यामुळे त्याला Y+ सिक्योरिटी मिळाली. त्याला मिळालेल्या धमकी आणि सिक्योरिटीला पाहता सलमान खाननं 'आप की अदालत' मध्ये म्हटलं होतं की प्रत्येक ठिकाणी सुरक्षेत जातो. पण त्याला माहित आहे की जे होणार आहे, ते काहीही झालं तरी होणारच. सलमाननं म्हटलं की तो असं पक्ष्यासारखं नाही फिरणार, पण इतकं माहित आहे की देव आहे.
हेही वाचा : बिग बींच्या नातवासाठी शाहरुखच्या लेकिचं 'खास' सेलिब्रेशन; ते खरंच डेट करतायत?
सलमानच्या कामाविषयी बोलायचं झालं तर त्याचा 'टायगर 3' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. दिवाळीच्या निमित्तानं हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. आता पर्यंत म्हणजेच 10 दिवसात चित्रपटानं 243.95 कोटींची कमाई केली आहे. तर वर्ल्ड वाईड कलेक्शनविषयी बोलायचे झाले तर चित्रपटानं 729 कोटींची कमाई केली होती. आता सलमान खान लवकरच 'टायगर वर्सेस पठाण' आणि करण जोहरच्या नव्या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विष्णु वर्धन करणार आहेत. चित्रपटात सलमान पॅरामिलिट्री ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे.