Salman Khan : बॉलिवूड अभिनेता आणि राजकारणी रवि किशन यांनी बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच अभिनेता सलमान खानच्या वाईट काळाविषयी सांगितले आहे. एककाळ होता जेव्हा सलमान हा शांत असायचा. खरंतर रवि किशन आणि सलमान खान या दोघांनी 'तेरे नाम' या चित्रपटात काम केलं होतं. या चित्रपटातील सलमान खानची 'राधे' ही भूमिका प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडून गेली. आता रवि किशन यांनी या चित्रपटातील एक किस्सा सगळ्यांसोबत शेअर केला आहे. त्यासोबत त्यांनी अक्षय कुमार आणि शाहरुख खान यांच्याविषयी देखील काही गोष्टी सांगितल्या. 


'तेरे नाम' चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान, शांत असायचा सलमान खान


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत रवि किशन यांनी सांगितलं की 'टिंग दरम्यान, सलमान खान त्याच्या आयुष्यातील खूप वाईट परिस्थितीतून जात होता. तो खूप शांत असायचा. हेच कारण होतं की तेरे नाम मध्ये सलमान खानचा अभिनय हा प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडून गेला होता. सलमान खूप चांगला माणूस आहे. जेव्हा सलमान खान तेरे नाम करत होते, तेव्हा त्यांच्या त्या वाईट काळाला मी पाहिलं आहे. दीड दोनतास वर्कआऊट करायचा. संपूर्ण दिवस शूटिंग करायचे आणि त्यानंतर देखील जिमसाठी वेळ काढायचे.'


रवि किशन यांनी केली शाहरुख आणि अक्षयची स्तुती!


याच मुलाखतीत पुढे रवि किशन हे शाहरुख खान आणि अक्षय कुमार यांच्याविषयी देखील बोलले. अक्षय कुमार यांच्यासोबत तर नुकताच 'मिशन रानीगंज' हा चित्रपट केला. शाहरुख खान आणि अक्षय कुमार या दोघांना कामाचं वेड आहे. शाहरुख खान तर 103 ताप असताना देखील सेटवर यायचा. हे दोन असे कलाकार आहेत जे कामासाठी जिंवत राहण्यासाठी लठू शकतात आणि मरूही शकतात. 


हेही वाचा : वडिलांसोबत अक्षय खन्नाला कामच करायचं नव्हतं; 15 वर्षांपूर्वीच सांगितले कारण


कधी झाला होता ऐश्वर्या आणि सलमानचा ब्रेकअप?


'तेरे नाम' हा चित्रपट 2003 मध्ये प्रदर्शित झाला होता. तर त्याच्या एक वर्ष आधी म्हणजे 2002 मध्ये सलमान आणि ऐश्वर्याचा ब्रेकअप झाला होता. त्या ब्रेकअपचा सलमानवर खूप वाईट परिणाम झाला होता. त्या दोघांची पहिली भेट ही संजय लीला भन्साळी यांच्या 'हम दिल दे चुके सनम' या चित्रपटाच्या सेटवर झाली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन हे सतीश कौशिक यांनी केले होते. या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका सलमान खान आणि भूमिका चावला यांच्या होत्या. चित्रपटात रवि किशन यांनी सहाय्यक कलाकाराची भूमिका साकारली होती.