सततच्या धमक्या पाहता Salman Khan चा मोठा निर्णय, कलाजगताच्या वळल्या नजरा
Salman Khan`s New Bulletproof Car : सततच्या धमक्या पाहता बॉलिवूडचा भाईजान सलमान खाननं मोठा निर्णय घेतला आहे. तर सलमानच्या या निर्णयानं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. याशिवाय सलमाननं काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत तरुण कलाकार कशा प्रकारे त्यांच्या मानधनात वाढ करतात हे सांगितले होते.
Salman Khan's New Bulletproof Car : बॉलिवूड अभिनेता सलमान खान (Salman Khan) हा गेल्या काही दिवसांपासून 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्या आधी सलमान एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत होता. त्याचे कारण म्हणजे त्याला सतत मिळणाऱ्या जीवेमारण्याच्या धमक्या. सततच्या जीवेमारण्याच्या धमक्या मिळत असताना सलमाननं नुकतीच Nissan Patrol SUV घेतली आहे. ही गाडी अजून भारतात लॉन्च देखील झाली नाही. गॅंगस्टर लॉरेन्स बिश्नोई सतत कोणत्या ना कोणत्या प्रकारे सलमानला जीवेमारण्याची धमकी देत आहे. कधी त्याच्या वडिलांकडे एक पत्र देत तर कधी त्याच्या गॅंगमधील एक व्यक्ती सलमानच्या ऑफिसमधील एका व्यक्तीला मेल केला. दरम्यान, या सगळ्या प्रकरणात सुरक्षेच्या दृष्टीनं सलमाननं हा मोठा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे.
सलमाननं त्याची ही नवी गाडी Nissan Patrol SUV परदेशातून इम्पोर्ट केली आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही गाडी भारतात अजून लॉन्च झाली नाही. ही गाडी दाक्षिणात्य आशिया बाजारात सगळ्यात जास्त लोकप्रिय आणि महागडी आहे. या गाडीविषयी बोलायचे झाले तर ही गाडी सुरक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाची आहे. सलमाननं ही नवीन गाडी कधी घेतली याविषयी कोणाला माहिती नाही, मात्र सलमान नुकत्याच एका कार्यक्रमात या गाडीतून आला होता, तेव्हा या विषयी सगळ्यांना कळालं. सलमानच्या या गाडीच्या किंमतीविषयी कोणतीही माहिती समोर आली नाही.
सलमाननं नुकत्याच एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी तो Nissan Patrol SUV या गाडीतून आला होता. त्याच्यासोबत Toyota Fortuner आणि Mahindra Bolero Neo अशा अनेक गाड्या होत्या. तर त्याशिवाय प्रायव्हेट सिक्योरिटी व्यतिरिक्त मुंबई पोलिसांचे अधिकारी देखील दिसले होते.
हेही वाचा : Warrant Against Ameesha Patel : अमीषा पटेलनं उद्योगपतीला फसवलं? जाणून घ्या नेमकं प्रकरण
सलमानच्या कार कलेक्शनविषयी बोलायचे झाले तर त्याच्याकडे Mercedes Benz S-Class, Lexus LX 470, ऑडी A8, Porsche Cayenne, रेंज रोव्हर Autobiography, ऑडी RS7, मर्सडीज AMG GLE 63 S आणि Mercedes Benz GL-Class देखील आहेत. तर सलमानच्या कामाविषयी बोलायचे झाले तर त्याशिवाय तो 'टायगर 3' या चित्रपटात देखील दिसणार आहे. तर सलमान लवकरच फिल्मफेअरमध्ये सुत्रसंचालन करताना दिसणार आहे. त्या निमित्तानं सलमाननं एक मुलाखत देखील दिली होती. त्यावेळी सलमान अनेक गोष्टींवर बोलला होता. त्यापैकी एक म्हणजे त्याला येणाऱ्या जीवेमारण्याच्या धमक्या आणि तरुण कलाकार त्यांचं मानधन कसं वाढवतात.