Salman Khan's torn shoe : बॉलिवूड अभिनेता सलमान खान गेल्या काही दिवसांपासून त्याच्या 'टायगर 3' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्या दरम्यान, एकीकडे सलमान खानच्या एका कार्यक्रमातील बूटांची चर्चा सुरु आहे. सलमान खाननं एका कार्यक्रमात त्याची या चित्रपटातील सह-कलाकार कतरिना कैफसोबत हजेरी लावली होती. यावेळी सलमाननं फाटलेले आणि कुजलेले असे बूट घातली होती. इतक्या कोटींच्या संपत्तीचा मालक असून सलमाननं असे बूट का घातली असा प्रश्न अनेकांना पडला होता. मात्र, हे बूट फाटलेली नाही तर ते ब्रॅंडेड आहेत. याविषयी सलमानला भेटलेल्या पत्रकारानं सांगितलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलमान खाननं कतरिनासोबत त्याची भाची अलिझे अग्निहोत्रीच्या 'फर्रे' या चित्रपटाच्या स्क्रीनिंगला हजेरी लावली होती. त्या कार्यक्रमातील सलमान खानचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यात सलमाननं फाटके आणि कुजलेली बूट घातली. त्यावरून अनेक लोकांनी सोशल मीडियावर चर्चा सुरु केली. त्यावरून सुरु असलेली चर्चा पाहता सलमानला त्या दिवशी भेटलेली पत्रकार 



सलमान खानच्या फाटलेल्या बुटांनी वेधलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोटींच्या संपत्तीचा मालक असूनही सलमान खाननं फाटके बूट का घातले? आणि त्याला असे बूट घालताना लाज वाटली नाही का? सलमान खानचा हा फोटो पाहून सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. खरंतर सलमान खाननं घातलेली बूट ही फक्त फाटलेली नाही तर त्यासोबतच जुनी देखील आहेत. ते खूप खराब झाल्याचे फोटोत दिसत आहे. पण त्यावेळी त्याच्यासोबत असलेल्या पत्रकारानं त्याविषयी एक पोस्ट शेअर केली आहे. त्याविषयी सांगत ती पत्रकार म्हणाली सलमान खाननं फाटलेले बूट घातलेले नाही. पण ते एका लग्झरी ब्रॅंडचे शू आहेत. इतकंच नाही तर ही फॅशन देखील आहे. तुम्हाला विश्वास होत नाही? पण Balenciaga चे शूज पाहिल्यानंतर तुम्हाला विश्वास होईल आणि हेच तुमच्या चुकीच्या विचारासाठी उत्तर आहे. तर या बुटांची किंमत ही 1 लाख 42 हजार 962 असल्याचे म्हटले जाते. 



हेही वाचा : ...तर तुटलं असतं कतरिना अन् विकीचं लग्न? कतरिना संतापून म्हणालेली, 'लग्न विसरुन जा, कारण...'


सलमानच्या 'टायगर 3' या चित्रपटानं भारतात 13 व्या दिवशी 3.5 कोटींची कमाई करत आतापर्यंत एकूण 275 कोटींची कमाई केली. तर हा चित्रपट 300 कोटींच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये बाजी मारेल की नाही अशी शंका सगळ्यांना होऊ लागली आहे.