मुंबई : बाहुबली २ द कनक्लूजन हा सिनेमा हिंदी सिनेसृष्टीतील सर्व रेकॉर्ड मोडतोय. या सिनेमाने १००० कोटीहून अधिक कमाई केलीये. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्वांनीच या सिनेमाचे कौतुक केलेय. मात्र बॉलीवूडचा दबंग खान याने अद्याप बाहुबली २ पाहिलेला नाहीये. बाहुबली २ करत असलेच्या प्रचंड कमाईबद्दल सलमानने नुकतेच एक विधान केलेय. 


ट्यूबलाईट या आगामी सिनेमाच्या ट्रेलर लाँचदरम्यान सलमानने हे विधान केलेय. सलमान म्हणाला, बाहुबली ४ वर्षात बनलाय. त्यानंतर हा सिनेमा इतकी कमाई करतोय आणि मी दोन वर्षात सिनेमा करतो त्यामुळे ४ वर्षातील माझ्या सिनेमांच्या कमाईची सरासरी काढल्यास तितकीच होईल.