Video : पुन्हा एकदा Salman Khan रितेश देशमुख साठी लावणार बाजी!
Salman Khan नं हा व्हिडीओ शेअर करत रितेशला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Salman Khan wished riteish Deshmukh on his birthday : बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. रितेशचा आज 17 डिसेंबर रोजी 44 वा वाढदिवस आहे. रितेश सध्या त्याच्या आगामी 'वेड' (Ved Movie) या मराठी चित्रपटामुळे चर्चेत आहे. यावेळी रितेशनं दिग्दर्शनात पदार्पण केलं आहे. या चित्रपटात रितेश आपल्याला एक सीरिअस भूमिका साकारताना दिसणार आहे. रितेश आणि बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या (Salman Khan) मैत्रीविषयी तर सगळ्यांनाच ठावूक आहे. रितेशला सलमाननं त्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत खास शुभेच्छा दिल्या आहेत.
सलमाननं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे, हा व्हिडीओ खूप खास आहे, कारण सलमाननं रितेशच्या वेड चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे. सलमाननं ‘वेड लावलय’ या गाण्यात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकरली आहे. या गाण्याचं टीझर शेअर करत त्यानं रितेशला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भाऊचा बर्थडे आहे भेट तर द्यायची होतीच, असं कॅप्शन सलमाननं गाण्याचं टीझर शेअर करत दिलं आहे.
पाहा टीझर
हेही वाचा : तेव्हा माझे वडील मुख्यमंत्री होते; S#* कॉमेडी चित्रपट करण्यावर Riteish Deshmukh च मोठ वक्तव्य
रितेश हा बॉलिवूडमधील टॉपच्या कलाकारांपैकी एक असला तरी देखील तो जमिनीशी जोडलेला आहे. रितेशच्या 'वेड' या चित्रपटात त्याची पत्नी जिनिलिया देखील दिसणार आहे. रितेश हा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतो. या चित्रपटात रितेशसोबत त्याची पत्नी जिनिलिया देशमुख मुख्य भूमिकेत आहे. दरम्यान, त्यानं 'वेड'चा ट्रेलर शेअर करताच प्रेक्षकांनी त्याच्यावर कौतुकांचा वर्षाव केला आहे. हा चित्रपट 30 डिसेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. (Salman Khan shares first glimpse of his special appearance in Riteish Deshmukhs Ved Genelia Deshmukh)