मुंबई : संजय लीला भन्साळी आणि सलमान खानचे चाहते खूप खूष झाले होते. याला कारण आहे 'इंशाअल्लाह' या सिनेमाची घोषणा. पण काही दिवसांनी खूप मोठा खुलासा झाला की, हा सिनेमा होणार नाही. सिनेमाची घोषणा होऊनही हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिनेमा का होणार नाही? यावर वेगवेगळे कारण समोर आली. अभिनेता सलमान खानने संजय लीला भन्साळी यांच्या स्क्रिप्टमध्ये हस्तक्षेप केल्यामुळे काढता पाय घेतल्याच उघड झालं आहे. पण आता सलमान खानने स्वतः मोठा खुलासा केला आहे. 


सलमान खानने पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, संजय लीला भन्साळी माझे खूप चांगले मित्र आहेत. इंशाअल्लाहचा अर्थ देवाची मर्जी. मला वाटतं, हीच देवाची मर्जी आहे. 


तसेच नुकतंच IIFA अवॉर्ड पुरस्कारात अभिनेत्री आलिया भट्टला देखील इंशाअल्लाहबद्दल विचारण्यात आलं. तेव्हा तिने हा सिनेमा होणार नसल्याचं सांगितलं आणि इंशाअल्लाह ऐवजी दुसरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याचं सांगितलं. (हे पण वाचा : आलिया भट्टच्या हाती नवा सिनेमा...


संजय लीला भन्साळी यांच्या 'गंगूबाई' या सिनेमात मुख्य भूमिकेत अभिनेत्री आलिया भट्ट दिसणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आलिया काही दिवसांपूर्वी संजय लीला भन्साळी यांच्या ऑफिसबाहेर स्पॉट झाली. आलियाच्या अगोदर प्रियंका चोप्राची निवड झाली होती. पण तिच्या बिझी शेड्युलमुळे हा सिनेमा आता आलियाकडे गेला आहे. प्रियंका एका अमेरिकन कॉमेडी सिनेमात दिसणार आहे.