जोधपूर : १९९८मध्ये घडलेल्या काळवीट शिकार प्रकरणात जोधपूर कोर्टाने सलमान खानला पाच वर्षांची शिक्षा सुनावल्यामुळे सलमानने कालची रात्र तुरुंगात घालवली. सलमानला वन्य संरक्षण अधिनियमच्या कलम ५१ अंतर्गत शिक्षा सुनावण्यात आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जोधपूरच्या डीआयजी विक्रम सिंह यांनी मीडियाशी बातचीत करताना सांगितले, सलमानला खानला अन्य कैद्यांप्रमाणेच ठेवण्यात आले होते. त्याला जेलच्या बॅकर नंबर दोन सेल नंबरमध्ये ठेवण्यात आले होते. सलमानला झोपण्यासाठी चार चादरी देण्यात आल्या होत्या. तसेच तो जमिनीवर झोपला. डॉक्टरांनी सुरुवाती केलेल्या चेकअपमध्ये सलमानचा ब्लड प्रेशर वाढला होता मात्र नंतर तो नॉर्मल झाला.


काळवीट शिकार प्रकरणात सलमान वगळता इतर सर्वांना निर्दोष ठरवण्यात आले. सैफ अली खान, तब्बू, नीलम, सोनाली बेंद्रे यांना कोर्टाने निर्दोष ठरवले. मात्र सलमानला पाच वर्षांची शिक्षा सुनावली. त्याच्या जामीन अर्जाबाबत आज सुनावणी होतेय.


काय आहे हे प्रकरण?


'हम साथ साथ हैं ' या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सैफ अली खान, नीलम, तब्बू आणि सोनाली बेंद्रे राजस्थानला गेले होते. त्यावेळी त्यांनी शिकार केली. काळवीटाच्या हत्येवर स्थानिक बिष्णोई समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर सलमान खान आणि अन्य सहकलाकारांविरोधात गुन्हा दाखल झाला.