मुंबई : सलमान आणि अरिजीत यांच्यातील वाद पुन्हा एकदा समोर आला आहे 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुल्तान सिनेमाच्या रिलीजच्या वेळी सलमान आणि अरिजीत यांच्यातील समोर आलेला वाद पुन्हा एकदा पेटला आहे. अरिजीत सिंहने माफी मागूनही हा वाद क्षमला नाही. असा अंदाज लावला जात आहे की, सलमान खानने ''वेलकम टू न्यूयॉर्क'' या सिनेमातून देखील अरिजीत सिंहचं गाणं हटवलं आहे. 


मीडिया रिपोर्ट्सनुसार, काही दिवसांपूर्वी सोनाक्षी सिन्हाच्या 'वेलकम टू न्यूयॉर्क'मधील गाणं "नैन फिसल गए" रिलीज झालं. मात्र ‘वेलकम टू न्यूयॉर्क’ या आगामी चित्रपटातील अरिजीतचे गाणे सलमानने काढून टाकले आहे. ‘वेलकम टू न्यूयॉर्क’ या चित्रपटात सोनाक्षी सिन्हा लीड रोलमध्ये आहे. सलमान यात कॅमिओ करताना दिसणार आहे. याच चित्रपटातील एक गाणे अरिजीतच्या आवाजात रेकॉर्ड करण्यात आले होते. मात्र सलमानने अरिजीतचे गाणे नसेल तरच मी कॅमिओ करणार, अशी अट ठेवली. त्याची ही अट मान्य करत, मेकर्सने  संबंधित गाणे फतेह अली खान यांच्या आवाजात नव्याने रेकॉर्ड केले. या सिनेमांत दिलजीत दोसांज, करण जोहर, ऋतेश देशमुख आणि बोनम ईराणी या कलाकारांच्या महत्वाची भूमिका आहे. 


नेमकं सलमान आणि अरिजीतमध्ये काय झालं? 


एका अवार्ड शोमध्ये सलमान आणि अरिजीत यांच्यात बिनसले होते. हा अवार्ड शो सलमान होस्ट करत होता. या शोमध्ये अरिजीतला पुरस्कार जाहीर झाला आणि सलमानने अरिजीतच्या नावाचा पुकारा केला. पण पुकारा झाल्यानंतर अरिजीत बऱ्याच वेळानंतर स्टेजवर आला. त्यावेळी त्याच्या पायात चप्पल होती, केस विस्कटलेले होते. स्टेजवर पोहोचताच, तू विजेता आहेस? असा खोचक प्रश्न सलमानने अरिजीतला केला होता. यावर अरिजीतनेही तुम्हीचं मला झोपवले, बसल्या बसल्या माझा डोळा लागला, असे सांगत सलमानला डिवचले होते. तेव्हापासून सलमान अरिजीतवर नाराज आहे.