Salman Khan Viral Video : बॉलिवूडचा भाईजान सलमान खानची एक झलक पाहण्यासाठी त्याचे चाहते हे आतुर असतात. जिथे कुठे तो दिसेल त्याला पाहतात पापाराझी 'भाई भाई' बोलत ओरडताना दिसतात. सलमान खान नुकताच एका कार्यक्रमात स्पॉट झाला. तर याच कार्यक्रमातील सलमानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्याचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. तर ते लवकरच त्यानं ठिक व्हावं यासाठी प्रार्थना करत असल्याचं म्हणत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलमानचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीनं शेअर केला आहे. या व्हिडीओत सलमाननं टी-शर्ट आणि जीन्स परिधान करत नेहमी प्रमाणे कॅज्युअल लूक केल्याचे दिसत आहे. त्यावेळी त्यानं चाहत्यांशी चर्चा केली आणि सगळ्यांना आवाहन केलं की सगळ्यांना इको-फ्रेंडली गणपती बनवा. जेणे करून पर्यावरणाला नुकसान होणार नाही. त्यावेळी सलमाननं प्रेक्षकांचे मनोरंजन देखील केले आणि त्यांच्यासोबत मस्ती देखील केली. पण त्याचा एक व्हिडीओ पाहता सगळ्यांना आश्चर्य झालं आहे. सुरुवातीला सलमान हा सोफ्यावर बसल्याचे पाहायला मिळते. त्यानंतर 58 वर्षाच्या सलमानला सोफ्यावरून उठायला अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे पाहायला मिळते. हे पाहून त्याच्या चाहत्यांना त्याची चिंता वाटू लागली आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सलमानची नुकतीच बरगड्यांची एक सर्जरी झाली. तरी देखील तो कार्यक्रमात पोहोचला होता. हे पाहता अमृता फडणवीसांनी देखील सलमान खानचे आभार मानले. खरंतर या सर्जरीतून सलमान अजूनही पूर्णपणे बरा झालेला नाही आणि ते त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसून येत आहे. 


त्याचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी त्यावर कमेंट करत आहेत. एक नेटकरी म्हणाला, 'याच कार्यक्रमात कळलं की भाईची तब्येत ठीक नाही तरी तो या कार्यक्रमात आला.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'सलमानला अजूनही गंभीर दुखापत आहे तरी देखील ज्यांना काही माहित नाही ते त्याला ट्रोल करत आहेत.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'भाई लवकरात लवकर बरा हो.'


हेही वाचा : 'बायकोसमोर कायम हार मानायलाच हवी'; असं का म्हणाले अमिताभ? जया बच्चन आहेत याचं कारण?


सलमानच्या आगामी प्रोजेक्टविषयी बोलायचे झाले तर तो लवकरच 'सिकंदर' मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन एआर मुरुगदॉस करत आहेत. सध्या तो त्याच्याच शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तर हा चित्रपट पुढच्यावर्षी ईद 2025 मध्ये प्रदर्शित होणार आहे.