मुंबई : सध्या सगळीकडे लग्नाची धामधूम सुरू आहे. त्यात जर बॉलिवूडच्या दबंग खानच्या लग्नाची बातमी कानावर आली तर आश्चर्यच. बॉलिवूडचा 'मोस्ट एलिजिबल बॅचलर' सलमान खान कधी लग्न करणार ही चर्चा नेहमीच रंगत असते. ५३ वर्षाच्या सलमानला नेहमी लग्न कधी करणार हा प्रश्न विचारला जातो. सलमानचं नाव अनेक अभिनेत्रींसोबत जोडण्यात आले आहे. पण सूत मात्र कोणासोबतही जुळले नाही. आता खुद्द त्याने २३ मे रोजी आपण लग्नाची तारीख घोषित करणार असल्याचे गंमतीशीरपणे सांगितले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'मुंबई मिरर'ला दिलेल्या मुलाखतीत सलमानला लग्न कधी करणार असा प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा त्याने आपण २३ मे रोजी लग्नाच्या तारखेची घोषणा करणार असल्याचे उत्तर दिले. २३ मे रोजी लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. त्यामुळे त्याच्या लग्नापेक्षा महत्वपूर्ण विषय लोकसभा निवडणुकांचे निकाल आहेत. देशातील प्रत्येकाचे लक्ष निकालाकडे असणार आहे. त्यामुळे माझ्या लग्नाकडे कोणाचेही लक्ष नसेल, असे मजेशीर उत्तर सलमानने दिले. 


काही दिवसांपूर्वी त्याने वडील होण्याची इच्छा व्यक्त केली होती. सलमान लग्नबंधनात अडकणार नसला तरी तो सरोगसीच्या माध्यमातून वडील होण्याचा विचार करत आहे. सलमान खान सध्या त्याच्या 'भारत' चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सलमानचा हा बहुप्रतिक्षित चित्रपट ईदच्या मुहूर्तावर ५ जून रोजी प्रदर्शित होणार आहे.