सलमान खानला बदलायचा आहे बिग बॉसचा हा नियम
मुंबई : अभिनेता सलामान खान बिग बॉसचे ११ वे पर्व घेऊन पुन्हा रसिकांच्या भेटीला आला आहे.
मंगळवारी त्याने या कार्यक्रमाच्या शूटिंगला सुरूवात केली आहे. त्यावेळी पत्रकारांशीही त्याने संवाद साधला.
सलमान खानच्या मते, 'शो मध्ये येणारा प्रत्येक स्पर्धक त्याच्या करिअरला नव्याने सुरूवात करण्यासाठी येथे येतो. तेव्हा या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्यानंतर प्रत्येकाने किमान सामंजस्याने वावरणं गरजेचे आहे.
खेळ,त्यामधील कठीण परिस्थिती आणि कूटनिती यांचा सामना करताना काही वेळेस तोल बिघडणं सहाजिक आहे. परंतू हा वाद स्पर्धकांनी टोकाला नेऊ नये.
बिग बॉसमधील एखादा नियम बदलायचा झाल्यास तो कोणता असावा ? असा प्रश्नदेखील एका पत्रकराने विचारला. तेव्हा सलमान म्हणाला, ' बिग बॉसमध्ये पहिल्याच आठवड्यात एलिमनेशन नसावे. नव्या लोकांची ओळख करण्यासाठी, एकमेकांशी जुळवून घेण्यासाठी वेळ लागतो. तो स्पर्धकांना मिळावा.