Salman Khan Threat: जीवे मारण्याच्या धमकीनंतर सलमानच्या घराबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त, पहा VIDEO
Salman Khan House Security by Mumbai Police: बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला धमकी आल्यानंतर मुंबई पोलिसांनी (Salman Khan Case) सलमानच्या घराबाहेर कडक बंदोबस्त लावला आहे. सध्या मुंबई पोलिस यावर कारवाई करताना दिसत आहेत. गॅलक्सीबाहेर (Salman Khan House) मुंबई पोलिसांनी बंदोबस्त लावलाय.
Salman Khan House Security: बिश्नाई गॅंगकडून सलमान खानला जीवे मारण्याची धमकी (Salman Khan Threat) आल्यानंतर मुंबईतील सलमानच्या घराबाहेर पोलिसांनी कडक (Mumbai Police) बंदोबस्त लावला आहे. सलमान खानला याआधी बिश्नाई गॅंगकडून (Lawrence Bishnoi) अनेकदा धमकी आली. परंतु आता पुन्हा एकदा धमकीचा मेल आल्यामुळे आता मुंबई पोलिस अॅक्शनमोडमध्ये आले आहेत. सलमानच्या 'गॅलेक्सी' (Salman Khan House) या बंगल्याबाहेर पोलिसांना कडक बंदोबस्त लावला आहे. सध्या या बंदोबस्तातील दृश्ये ही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Salman Khan Threat mumbai police security outside salman khan house video goes viral)
दोन दिवसांपुर्वी अभिनेता सलमान खानला एक धमकीचा मेल आला आहे. हा मेल त्याच्या मॅनेजरला उद्देशू आहे. सलमान खानला धमकी आल्यानंतर सलमान खान यांच्या मॅनेजरनं मुंबईतील (Salman Khan Manager) बांद्रा पोलिस ठाण्यात धमकीबाबत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आयपीसी (IPC) कलम 506(2), 120 (B) आणि 34 अंतर्गत लॉरेन्स बिश्नोई, गोल्डी, बराड आणि रोहित बराड यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.
काय आहे 'त्या' मेलमध्ये?
बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा मॅनेजर प्रशांत गुंजलकर यांना 18 मार्च रोजी सलमानला जीवे मारण्याच्या धमकीचा एक मेल आला होता त्यानंतर पुन्हा एकदा सगळीकडे खळबळ उडाली आहे. या मेलमध्ये सलमान खानला प्रत्यक्ष भेटून त्याच्यासोबत बोलण्याची मागणी करण्यात आली आहे. या मेल रोहित गर्ग याच्या नावानं आला आहे. गोल्डी बराडला तुझ्या बॉससोबत, सलमान खानसोबत बोलायचं आहे अशा मेल सलमानच्या मॅनेजरला आला आहे. पुढे तो म्हणतो की, त्यानं मुलाखत पाहिली असेल पण नसेल तर पाहायला सांग आणि मॅटर क्लोज करायला सांग. फेस टू फेस करायचे असेल तरीही सांग. आता वेळ आहे म्हणून इन्फॉर्म केलं. पुढच्या वेळी झटकाच बघायला मिळेल असं या ई-मेलमध्ये म्हटले आहे.
तुरूंगात असलेल्या लॉरेन्स बिश्नोईनं एका मुलाखतीतून सलमान खानला धमकी दिली होती. त्यात तो म्हणाला होता की, त्याच्या परिसरात कधी कुठल्या प्राण्याची शिकार होत नाही वा झाडी तोडली जात नाहीत, परंतु बिश्नाईंच्या परिसरात त्यानं शिकार केली. सलमाननं माफी मागावी नाहीतर त्याचा अहंकार कसा संपवायचा याचा बंदोबस्त केला जाईल अशी धमकी त्यांन सलमानला दिली होती. आता पुन्हा एकदा हा मेल आल्यानंतर सगळीकडेच याची चर्चा सुरू झाली आहे.
पोलिसांचा कडक बंदोबस्त
धमकीचा मेल येताच सलमान खानच्या बंगल्याबाहेर कडक बंदोस्त करण्यात आला आहे तेव्हा या संदर्भात आता पोलिस योग्य ती कारवाई करतील.