`या` गॅंगस्टरने सलमानला दिली जीवे मारण्याची धमकी!
त्याच्याबद्दलचा अपशब्द चाहत्यांना सहन होत नाही. तर सल्लूला चक्क जीवे मारण्याची धमकी... ?
नवी दिल्ली : बॉलिवूडचा दबंग खान म्हणजे १०० कोटींचा किंवा त्याहुन अधिक कोटींचा गल्ला करणारा अभिनेता. त्याचे जगभरात लाखो चाहते आहेत. अजूनही तरूणींच्या हृदयात त्याचे स्थान आहे. त्याच्याबद्दलचा अपशब्द चाहत्यांना सहन होत नाही. तर आपल्या सल्लूला चक्क जीवे मारण्याची धमकी... ?
काय आहे हे प्रकरण?
झी हिंदुस्तानच्या वृत्तानुसार, गॅंगस्टर लॉरेंस विश्नोई ने जोधपूर कोर्टात सलमानला जीवे मारण्याची धमकी दिली. हा गॅंगस्टर म्हणाला की, मी सलमानला जोधपूरमध्येच मारेन. असा व्हिडिओ देखील समोर आला आहे. गुरूवारी सलमान जोधपूरला गेला होता. १९९८ मध्ये काळवीटाच्या शिकारीचा खटला अजूनही सुरूच आहे. याच्याच सुनावणीसाठी सलमान जोधपूर कोर्टात हजर राहीला होता.
कोण आहे तो गॅँगस्टर?
सलमान जोधपूर कोर्टात असताना हा गॅंगस्टरला देखील एका खटल्याच्या सुनावणीसाठी पोलीसांनी कोर्टात सादर केले होते. या गॅंगस्टरवर खंडणी मागितल्याचा आरोप आहे. हम साथ साथ है च्या शूटिंग दरम्यान सलमानने काळवीटाची शिकार केल्यापासून त्याच्यावर हा खटाला सुरू आहे. या खटल्याची अंतिम सुनावणी १३ सप्टेंबरला आहे.