काळवीट शिकारप्रकरणी अभिनेता सलमान जोधपूर कोर्टात
सकाळी ८ वाजता सलमान कोर्टात हजर होणार होता. सलमानसोबत त्याची बहीण अलवीरा आणि बॉडीगार्ड शेरा जोधपूरला पोहचलेत.
जोधपूर : काळवीट शिकारप्रकरणी अभिनेता सलमान खान जोधपूर कोर्टात आज हजर राहणार आहे. कालवीट शिकारप्रकरणी सलमान खानला पाच वर्षाचीं शिक्षा सुनावली होती. या शिक्षेविरोधात सेशन कोर्टात आज सुनावणी होणार आहे. सलमानचे वकील ही शिक्षा रद्द करण्याचा युक्तीवाद कोर्टात करणार आहेत. यापूर्वी कोर्टात उपस्थित राहण्यासाठी सलमान खान कालच जोधपूरला पोहचलाय. सकाळी ८ वाजता सलमान कोर्टात हजर होणार होता. सलमानसोबत त्याची बहीण अलवीरा आणि बॉडीगार्ड शेरा जोधपूरला पोहचलेत. तत्पूर्वी याप्रकरणी अभिनेता सैफ अली खान, अभिनेत्री निलम, सोनाली, तब्बू यांची निर्दोष मुक्तता करण्यात आलीय. सलमान पाच वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर ५ एप्रिलला त्याला ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यानंतर त्याने दोन दिवसांचा तुरूंगवास भोगला. मात्र ७ एप्रिलला सलमानला जामीन मिळाला होता.