Salman Khan 19-floor hotel in Bandra : अभिनेता सलमान खानसंदर्भातील मोठी बातमी. सलमान खान लवकरच मुंबईत हॉटेल बांधणार आहे. वांद्रेतल्या कार्टर रोडवर सलमान खान याचे हे अत्याधुनिक सुविधांनी युक्त 19 मजली हॉटेल उभं राहणार आहे. या प्रस्तावाला मुंबई महापालिकेनंही मंजुरी दिल्याचे सांगण्यात येत आहे. सलमानची आई सलमा खान यांच्या नावावर हा प्लॉट आहे. हॉटेलच्या प्लॉटवर आधी स्टारलेट सोसायटी होती. जिथे सलमान खान याच्या कुटुंबीयांनी अपार्टमेंट खरेदी केली होती. सुरुवातीला या इमारतीचा पुनर्विकास करण्याची योजना होती. मात्र कुटुंबाने नंतर तो बेत बदलल्याचे सांगितले जात आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सलमान खानच्या कुंटुंबीयांनी वांद्रे येथील कार्टर रोड येथील भुखंडावर निवासी संकुल बाधण्याची योजना होती. येथे सुरुवातीला स्टारलेट को ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी होती. सुरुवातीला या निवासी इमारतीच्या पुनर्विकासाची योजना आखण्यात आली होती. मात्र, त्यानंतर खान कुटुंबीयांनी हा प्लान रद्द करत तिथे हॉटेल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच BMC ने मंजूर केल्या इमारतीच्या आराखड्यात 19 मजली हॉटेल दाखविण्यात आले आहे. त्यामुळे सलमान खान हा मुंबईत हॉटेल बांधत असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे सलमानच्या चाहत्यांसाठी ही एक गुडन्यूज आहे. सलमान खानला भेटायला अनेक चाहते उत्सुक असतात. मात्र, त्याची भेट होत नाही. किमान आता त्याच्या हॉटेलमध्ये जाण्याची त्यांना नक्कीच संधी मिळेल.


असे असणार सलमान याचे हॉटेल


सलमान खान याने 69.90 मीटर उंचीच्या व्यावसायिक मध्यवर्ती वातानुकूलित इमारतीसाठी सुधारित सुधारित प्लान सादर केला आहे. यात तीन-स्तरीय तळघर, कॅफे आणि रेस्टॉरंटसाठी पहिला आणि दुसरा मजला, व्यायामशाळा आणि जलतरण तलावासाठी तिसरा मजला, सर्व्हिस फ्लोअर म्हणून चौथा मजला, कन्व्हेन्शन सेंटरसाठी 5वा आणि 6वा मजला आणि 7वा मजला हॉटेल वापरासाठी अशी 19  मजल्यांची ही इमारत असणार आहे. विशेष म्हणजे हे हॉटेलमधून समुद्राचे दर्शन होणा आहे.


याआधी मुंबईत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनेही हॉटेल व्यवसायात पैसे गुंतवले होते. तेंडुलकर रेस्टॉरंट सुरु केले होते. त्याआधीपासून अभिनेता सुनील शेट्टी या व्यवसायत आहे. आता सलमान खान हॉटेल व्यवसायात उतरत आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांसाठी एक चांगली बातमी आहे. दभंग भाई याच्या हॉलेटमध्ये आता चाहत्यांना आस्वाद घेण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे त्याचे हे अत्याधुनिक हॉटेल कधी सुरु होणार याची प्रतिक्षा करावा लागणार आहे.