मुंबई : वर्षाच्या शेवटच्या दोन महिन्यांत असे अनेक चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहेत. रोहित शेट्टीच्या 'सूर्यवंशी'बद्दल बोलायचं झालं तर हा चित्रपट ५ नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे. 'सूर्यवंशी'मध्ये अक्षय कुमार, कतरिना कैफ, रणवीर सिंग आणि अजय देवगण आहेत. कलाकारांचे चाहते चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहेत. वृत्तानुसार, अभिनेता सलमान खान त्याच तारखेला त्याचा 'अंतिम: द फायनल ट्रुथ' चित्रपट प्रदर्शित करण्याकडे लक्ष देत होता. भाईजानलाही दिवाळीतच त्याचा चित्रपट प्रदर्शित करायचा होता. पण हे होऊ शकलं नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रिपोर्ट्सनुसार, सलमान खान दिवाळीदरम्यान 'अंतिम: द फायनल ट्रुथ' रिलीज करण्याचा विचार करत होता. मात्र, विनंती केल्यानंतर त्यांनी आपला निर्णय बदलला. वृत्तानुसार, जेव्हा रोहित शेट्टीला कळलं की सलमान खान देखील त्याच तारखेला आपला चित्रपट प्रदर्शित करणार आहे, तेव्हा त्याने त्याची भेट घेतली आणि प्रदर्शनाची तारीख बदलण्याची विनंती केली.


एका अहवालानुसार, “सलमान खान त्याच्या अंतिम: द फायनल ट्रुथ या चित्रपटाच्या रिलीजची तारीख पाहत होता, त्यांच्या नजरेतील एक तारीख होती. ती म्हणजे 5 नोव्हेंबर, ज्या दिवशी सूर्यवंशी देखील रिलीज होणार होता. जेव्हा सूर्यवंशी दिग्दर्शक आणि सह-निर्माता रोहित शेट्टीला या घडामोडीबद्दल कळलं तेव्हा त्याने सलमान खानची भेट घेतली आणि त्याला त्याच्या चित्रपटाशी संघर्ष टाळण्याची विनंती केली. त्याने सुपरस्टारला सांगितलं की, सूर्यवंशीसारखा मोठा चित्रपट एकट्याने प्रदर्शित केला पाहिजे."