सलमान खानची चोरी पकडली गेली; अभिनेत्यावर फसवणूकीचा आरोप?
: नुकताच सलमान खान (Salman Khan) च्या `किसी का भाई किसी की जान` (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) सिनेमाचा ट्रेलर (Trailer) प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या ट्रेलर लॉन्चवेळी त्याच्यासोबत सिनेमाची सगळी टीम उपस्थित होती.
मुंबई : नुकताच सलमान खान (Salman Khan) च्या 'किसी का भाई किसी की जान' (Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan) सिनेमाचा ट्रेलर (Trailer) प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या ट्रेलर लॉन्चवेळी त्याच्यासोबत सिनेमाची सगळी टीम उपस्थित होती. ट्रेलर लॉन्चवेळचे अनेक फोटो व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता असाच एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यात तो त्याचे अॅब्स दाखवताना दिसत आहे. मात्र यावेळी तो ट्रोलही झाला आहे. कारण काही दिवसांपुर्वीच अभिनेत्याने त्याच्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये त्याचे सिक्स पॅक दिसत होते. यावेळी चाहत्यांनी त्याचे तोंड भरुन कौतुक केलं होतं.
मात्र नुकत्याच पार पडलेल्या ट्रेलर लॉन्चवेळी तिथे उपस्थित असलेल्या एका पापाराझींनी त्याला सिक्स पॅक दाखवण्याची विनंती केली. त्यानेही क्षणाचा विचार नं करता त्याच्या शर्टची बटनं उघडायला सुरुवात केली. आणि त्याची बॉडी दाखवली. मात्र असं करताच तो ट्रोल झाला कारण यावेळी त्याचे सिक्स पॅक दिसले नाही. त्यामुळे ट्रोलर्सने शेअर केलेल्या फोटोत VFX मुळे फोटो एडिट करुन शेअर केला असल्याचं सांगितलं आहे. आणि अभिनेत्या खूप ट्रोल केले आहे. तर ट्रोलर्स त्याने फसवणूक केल्याचंही म्हणत आहेत. ही त्याची बॉडी नव्हेच असं ट्रोलर्सचं म्हणणं आहे.
आता सलमान खानवर खूप मीम्सही व्हायरल होत आहेत. सलमान खानचा लवकरच 'किसी का भाई किसी की जान' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या ट्रेलरला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. या सिनेमात खूप मोठी स्टारकास्ट आहे.
सलमान खान फिल्म्स प्रोडक्शनचा 'किसी का भाई किसी की जान'या सिनेमाची निर्मिती सलमान खानने केली असून, फरहाद सामजी यांनी दिग्दर्शन केलं आहे. तसेच, या चित्रपटात सलमान खान, वेंकटेश दग्गुबाती, पूजा हेगडे, जगपती बाबू, भूमिका चावला, विजेंदर सिंग, अभिमन्यू सिंग, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल, शहनाज गिल, पलक तिवारी आणि विनाली भटनागर यांच्या भूमिका आहेत. अशातच, अॅक्शन, कॉमेडी, ड्रामा आणि रोमान्सने भरपूर असलेला 'किसी का भाई किसी की जान'हा चित्रपट 2023च्या ईदला प्रदर्शित होणार आहे.