Katrina Kaif चा डीप नेक बघितला पण सर्वांसमोर Salman Khan ला हे बोलण्याचा काय अधिकार
सलमान आणि कतरिनाचा एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय
मुंबई : बॉलिवूडचा दबंग सलमान खान आणि कॅटरीना कैफची जोडी चहात्यांना प्रचंड आवडते. सलमान कतरिनावर बऱ्याचवेळा प्रेम करताना दिसतो. नुकताच सलमान आणि कतरिनाचा एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यामध्ये सलमान कतरीनाला ड्रेस नीट करण्यासाठी सांगतो
कटरीना कैफचा ड्रेस बघून सलमान झाला अस्वस्थ
सलमान कटरीनाला घेऊन कायमच पजेसिव्ह असतो आणि ही बाब त्यांच्या व्हिडिओ वरून स्पष्टपणे दिसून येते. सोशल मीडियावर एक जुना व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात कॅटरिनाचा डिपनेक ड्रेस पाहून तो थोडा नाराज होतो आणि तिला ड्रेस नीट करण्याचा सल्ला देतो.
हा व्हिडीओ 2017चा आहे कतरिना आणि सलमान IIFA अवॉर्डच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये पोहोचले होते. सलमानने ब्लॅक कलरचा सूट घातला होता. तर कतरिनाने ऑरेंज कलरचा स्ट्राइक ड्रेस घातला होता. कतरिनाचा हा ड्रेस खूपच डिपनेक होता या ड्रेसला घेऊन सलमानने आक्षेप घेतला होता
लवकरच या चित्रपटात दिसणार एकत्र
सलमान आणि कतरिना लवकरच 'टायगर३' मध्ये एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटाचं शुटिंग सुरू झालं होतं. पण वाढत्या कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे हे शूटिंग थांबवण्यात आलं आहे. तर दुसरीकडे नुकताच कतरिना कैफचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं दिसून आलं होतं. पण आता तिचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.