मुंबई : ईद आणि सलमान खानचा चित्रपट हे दरवर्षी बॉक्सऑफिसवरील हीट समीकरण आहे. यंदा ईदच्या दिवशी सलमान खानचा 'ट्युबलाईट' हा सिनेमा प्रदर्शित झाला. पण तो फारसा जादू करू  शकला नाही.  पण आगामी ईदला सलमान खान 'रेस ३' ची भेट घेऊन येणार आहेत. या चित्रपटात त्याच्या सोबतीला जॅकलीन फर्नांडीस दिसणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या सलमान खान 'टायगर जिंदा है' या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण करत आहे. पण ऑक्टोबर महिन्यापासून सलमान रेस ३ च्या शूटिंगला सुरूवात करेल.  रमेश तौरानी या चित्रपटाचे निर्माते आहेत.
रेमो डिसुजा या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून आतापर्यंत केवळ जॅकलीन आणि सलमान या केवळ दोन अभिनेत्यांची नावं घोषित करण्यात आली आहेत. 


'रेस 3' या चित्रपटाचा मागील दोन भागाशी कोणताही संबंध नाही. असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे 'रेस 3' बाबत लोकांच्या मनात उत्सुकता आहे. हा चित्रपट जून महिन्याच्या ईदमध्ये रसिकांच्या भेटीला येणार आहे.