मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान (salman khan) बिग बॉस 16 (Bigg Boss 16) होस्ट करणार आहे. प्रत्येक सीझनमध्ये सलमान नेमकी किती फिस घेत असतो, याची नेहमीच चर्चा होत असते. आता अशीच चर्चा बिग बॉस 16 दरम्यान होत आहे. या सीझनसाठी तो नेमका किती फिस घेतोय याची चर्चा सुरु आहे. त्यामुळे जाणून घेऊय़ात या सीझनसाठी तो नेमकी किती फिस घेतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सीझन 4 पासून सलमान खान (salman khan) बिग बॉस होस्ट करत आहेत. यंदाचा 16 वा सीझन पकडला तर सलमान 12 वा सीझन होस्ट करत आहे.या इतक्या वर्षात सलमान खानचे नाव बिग बॉसशी अशा प्रकारे जोडले गेले आहे की, आता त्याच्याशिवाय या शोची कल्पनाही कोणी करू शकत नाही. इतकी त्याची आता क्रेझ आहे आणि बिग बॉसच्या प्रेक्षकांना त्याने जोडून ठेवले आहे. त्यामुळे दरवर्षी सलमान खानची फिस वाढत असते. बिग बॉस 16  (Bigg Boss 16) साठी आता तो किती फिस घेणार याची चर्चा सुरु झाली आहे. 


किती फिस घेतोय?
बिग बॉस 16 या  (Bigg Boss 16)  सीझनसाठी (salman khan) सलमान खान 1000 कोटी रूपयाची फी घेतल्याचे बोलले जात आहे. मात्र ही बातमी चुकीची आहे. याउलट या सीझनसाठी तो कमी फिस घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. 
   
फी कमी घेणार?
मीडिया रिपोर्टनुसार, बिग बॉस (Bigg Boss) आता ओटीटीमध्ये परतणार नाही आहे. कोरोनाच्या काळात OTT वर आलेल्या बिग बॉसला जास्त प्रेक्षकवर्ग मिळाला नव्हता. ज्यामुळे शोच्या निर्मात्यांना तोटा झाला होता. यानंतर स्पान्सर्सने देखील मागे आले आहेत. याच कारणामुळे सलमान खानने आपली फी कमी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. 


बिग बॉस 15 साठी घेतली इतकी फिस?
गेल्या वर्षी बिग बॉस 15 साठी (Bigg Boss) सलमान खानने 350 कोटी रुपये घेतले होते, अशी बातमी आली होती. त्यानुसार पाहिले तर यावेळी सलमान खान यापेक्षाही कमी शुल्क घेत आहे. पण या शोच्या निर्मात्यांनी किंवा स्वतः सलमान खानने याबाबत कोणतेही अधिकृत माहिती दिलेले नाही. त्यामुळे नेमकी तो किती फिस घेणार आहे याची माहिती मिळू शकली नाही आहे. 


'या' स्पर्धकांची नावे चर्चेत  
बिग बॉस 16 साठी (Bigg Boss 16) रिअ‍ॅलिटी शो लॉकअप विजेता मुनव्वर फारुकी, फैजल शेख म्हणजेच मिस्टर फैसू, भाबी जी घर पर हैं फेम शुभांगी अत्रे, इमली फेम फहमान खान, बंगाली अभिनेत्री नुसरत जहाँ, फ्लोरा यासारख्या स्टार्सची नावे चर्चेत आहे. 


बिग बॉसच्या 16 व्या (Bigg Boss 16) सीझनचा प्रोमो रिलीज झाला आहे. कलर्स टीव्हीवर 1 ऑक्टोबर 2022 रोजी हा शो प्रीमियर होईल. या शोची प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.