मुंबई : सलमान खानची सगळ्यात छोटी बहिण आता बरीच मोठी झाली आहे. हॉटनेसच्या बाबतीत देखील ही अभिनेत्री बऱ्याच अभिनेत्रींना टक्कर देते. सलमान खानच्या बहिणीचं नाव आशिका भाटिया आहे. ही गोष्ट वेगळी आहे की, आशिका सलमान खानची ऑनस्क्रिन बहिण होती. 'प्रेम रतन धन पायो' या सिनेमात आशिकाने सलमानच्या बहिणीचा रोल प्ले केला आहे. आशिका सोशल मीडियावर भरपूर पॉप्यूलर आहे. अभिनेत्री आपल्या बोल्ड फोटों व्यतिरिक्त आपल्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'प्रेम रतन धन पायो'मध्ये सलमान खानच्या बहिण राधिकाची भूमिका साकारून आशिका रातोरात स्टार बनली. तिचा पूर्णपणे बदललेला लूक पाहता चाहते तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. ती अनेकदा तिच्या लूकमध्ये  वेगवेगळे बदल करताना दिसते. तिच्या हॉट आणि बोल्ड लूकने ती बॉलीवूडच्या मोठ-मोठ्या अभिनेत्रींना मागे टाकते. ज्या प्रकारे निरागस सौंदर्याने राजकन्येची आशिकाने भूमिका साकरली होती ते पाहता अभिनेत्रीचा हा बदलेला हॉट लूक पूर्णपणे वेगळा आहे.



अभिनयपासून दूर असलेली आशिका सध्या सोशल मीडियावर बरीच एक्टिव्ह दिसते. आशिका भाटियाचा अचानक फॅट टू फिट प्रवास पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. यासाठी अभिनेत्रीने बरीच मेहनत घेतली आहे. तिने डाएटच्या मदतीने वजन कमी केलं आहे. आशिकाचे सोशल मीडियावर 5.5 दशलक्षाहून अधिक फॉलोअर्स आहेत. ज्यांच्याशी ती अनेकदा संवाद साधताना दिसते. आशिकाचे डान्स व्हिडिओ पाहून ती प्रत्येक ट्रेंडला फॉलो करताना दिसते.