मुंबई : बॉलिवूडचा दबंगस्टार सलमान खान त्याच्या आयुष्यात अनेक ट्प्प्यांमधून गेला आहे. वैयक्तिक आणि प्रोफेशनल आयुष्यामध्ये सलमान खानने अनेक वाईट टप्पे पाहिले, परंतू या काळामध्ये सलमान खानसोबत त्याच्या कुटुंबीयांप्रमाणेच एक व्यक्ती कायम सोबत राहिली ती म्हणजे 'शेरा'. 'शेरा' हा सलमान खानचा बॉडीगार्ड आहे. गेली 21 वर्ष तो सलमानसोबत आहे. नुकतीच शेराने झी न्यूजच्या ऑफिसला भेट दिली आणि त्याच्यासोबतच्या मुलाखतीमध्ये काही खास गोष्टींचा उलागडा केला आहे.  


सलमान खानसाठी मुलीने ट्रेनमधून मारली उडी  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेरा  हा 21 वर्ष सलमान खानसोबत आहे. या दरम्यान त्याने सलमान खानला फार जवळून बघितले आहे. त्यामधील एक प्रसंग सांगताना शेरा म्हणाला सलमान आणि मी एका स्टेशनवर होतो. सलमान खानला पाहून एका मुलीने चालत्या ट्रेनमधून खाली उडी मारली. तिची आई ट्रेनमध्येच होती, त्यामुळे आम्हीच तिला उपचाराकरिता जवळच्या स्टेशन मास्टरच्या खोलीत नेले. तिला पाणी दिलं. या मुलीची आई त्यापाठोपाठ दुसर्‍या ट्रेनने परत आली. 


शेराच्या सिक्युरिटी एजन्सीला पुरस्कार  


शेराच्या सिक्युरिटी एजन्सीला नुकताच बॅंकॉंकमध्ये पुरस्कार  मिळाला आहे. बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितच्या हस्ते शेराचा गौरव करण्यात आला. बॅंकॉंकमध्ये इंटरनॅशनल एक्सिलन्सी अवॉर्ड मिळाला. 


अनेक इंटरनॅशनल स्टार्सना देतो सिक्युरिटी  


शेरा हा केवळ सलमान खानसाठी असला तरीही शेराच्या सिक्युरिटी कंपनीकडून अनेक आंतरराष्ट्रीय कलाकारांना सिक्युरिटी दिली जाते. मायकल जॅक्सन, जस्टीन बिबरच्या दिमतीला शेरा स्वतः होता. देशा-परदेशात 'द बॅंग' टूर साठी सलमान सोबतच कॅटरिना कैफ, सोनाक्षी सिन्हा, मनीष पॉल यांसोबत  शेरा असतो. त्याच्या कंपनीकडेच या कलाकारांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. 


 



शेराचाही 'टायगर' येतोय 


 शेराच्या मुलाचे नाव 'टायगर' आहे. सध्या 'टायगर' अ‍ॅक्शनसोबतच डान्स शिकण्याकडे लक्ष देत आहे. सलमान खानने टायगरचे कौतुक केल्याचेही त्याने मुलाखतीदरम्यान म्हटले आहे. सलमानने कौतुक केले म्हणजे त्या मुलामध्ये नक्कीच काही चांगले गुण पाहिले असतील असे तो म्हणाला.  


 'टायगर'चं नाव बदलणार का ?  


 बॉलिवूडमध्ये जॅकी श्रॉफचा मुलगा आला आहे. त्याचे नावही 'टायगर' आहे. मग या दोघांमधील नावांचे साधर्म्य टाळण्यासाठी भविष्यात जर शेराच्या 'टायगर'ची एंट्री होणार असेल तर नाव बदलणार का ? हा प्रश्न विचारल्यानंतर त्याने, अजूनही तसा विचार नाही परंतू भविष्यात गरज पडल्यास बघू असं तो म्हणाला.