नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा बजरंगी भाईजान हा सिनेमा काही दिवसांपूर्वी चीनमध्ये प्रदर्शित झाला. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगले प्रदर्शन करत होती आणि लवकरच  सिनेमाने १०० कोटींचा टप्पा गाठला. 


२०१५ मध्ये भारतात प्रदर्शित


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चीनमध्ये सिनेमा प्रदर्शित करणारा आमिर खान हा पहिला अभिनेता आहे. यापूर्वी आमिरच्या सिक्रेट सुपरस्टार या सिनेमाला चीनमध्ये उत्तम प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आमिरच्या मार्गावर चालत सलमाननेही आपला सिनेमा चीनमध्ये प्रदर्शित केला. बजरंगी भाईजान हा सिनेमा २०१५ मध्ये भारतात प्रदर्शित झाला होता. या सिनेमाने भारतात ३२०.३४ कोटींची कमाई केली होती.


कमी अवधीतच उत्तम प्रतिसाद


या सिनेमाचे दिग्दर्शन कबीर खान यांनी केले होते. सलमान खानच्या या सिनेमात हर्षाली मल्होत्राने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. यात तिने मुक्या मुलीची व्यक्तीरेखा साकारली आहे. अशा परिस्थितीत ती हरवते आणि मग सलमान तरी घरी पोहचवण्याची जबाबदारी उचलतो नि अनेक अडचणींनंतर तिला तिच्या घरी सुखरूप पोहचवण्यात येते. या सिनेमाने आतापर्यंत चीनमध्ये ९१.०७ कोटींचा गल्ला केला. चीनमध्ये हा सिनेमा २ मार्चला प्रदर्शित करण्यात आला होता.



रेस ३ च्या शूटिंगमध्ये व्यस्त


 सध्या सलमान रेस ३ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. रेमो डिसुझा दिग्दर्शित या सिनेमात बॉबी देओलही प्रमुख भूमिकेत आहेत. त्याचबरोबर सलमान लवकरच टी.व्ही. वरील दस का दम या शोचे सुत्रसंचालन करेल.